अर्थसंकल्प कोण मांडणार? वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत

अर्थसंकल्प कोण मांडणार? वैद्यकीय उपचारासाठी जेटली अमेरिकेत

सर्व काम नियोजनानुसारच होत असल्याची माहिती अर्थमंत्रालयातल्या सूत्रांनी दिली.

  • Share this:

नवी दिल्ली 16 जानेवारी : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला गेले आहेत. 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस त्यांना अमेरिकेत राहावं लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आठ महिन्यांपूर्वीच त्यांचं किडणी प्रत्यारोपणाचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे मोदी सरकारचा सहावा अर्थसंकल्प नक्की कोण मांडणार याची उत्सुकता निर्माण झालीय.

रविवारी रात्री जेटली हे न्यूयॉर्कसाठी रवाना झाले. तिथल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या काही चाचण्या होणार आहेत. 14 मे 2018 रोजी त्यांच्यावर किडणी प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. त्यानंतर  तीन महिने ते सुट्टीवर होते. त्या काळात पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार होता.

नरेंद्र मोदी सरकारचा सहावा आणि शेवटचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडण्यात येणार आहे. त्याला आता फक्त 15 दिवस राहिले आहेत. लोकसभेच्या निडणुका तोंडावर आल्याने या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अर्थमंत्रालयात जोरदार हालचाली सुरू आहे. आकडेमोड केली जातेय. नव्या योजना तयार केल्या जाताहेत असं व्यस्त वेळापत्रक असताना अर्थमंत्रीच सुटीवर असल्याने त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पण सर्व काम नियोजनानुसारच होत असल्याची माहिती अर्थमंत्रालयातल्या सूत्रांनी दिली.

किडणी प्रत्यारोपण झाल्यानंतर प्रकृतीला खूप जपावं लागतं. जास्त दगदग सहन होत नाही. खाण्या पीण्यावरही बंधनं येतात त्यामुळे जेटलींची पूर्वीसारखी सक्रियता शक्य  असणार नाही. अमेरिकेतल्या चाचण्यांसाठी त्यांना जास्त वेळ लागला तर अर्थसंकल्प कोण मांडणार याची चर्चा सुरू झालीय.

याआधी जसं पीयुष गोयल यांच्याकडे तात्पुरता कार्यभार दिला होता तशाच प्रकारे त्यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी सोपविली जाऊ शकते किंवा अर्थ राज्यमंत्र्यांना अर्थसंकल्प सादर करायला सांगितलं जाऊ शकते असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

Special Report : पाकिस्तानात दाऊद सुरक्षित नाही!

First published: January 16, 2019, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading