राहुल गांधी नापास विद्यार्थी तर मोदी 'टॉपर', जेटलींचा पलटवार!

राहुल गांधी नापास विद्यार्थी तर मोदी 'टॉपर', जेटलींचा पलटवार!

'राफेल करारावरून राहुल गांधींची दोन वक्तव्य जरी ऐकली तर ते पंतप्रधान मोदींवर वयक्तिक आकसातून आरोप करत असल्याचं स्पष्ट होतं.'

  • Share this:

नवी दिल्ली 10 फेब्रुवारी : अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेऊन परतल्यानंतर केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधी आणि विरोधी पक्षांवर हल्लाबोल केलाय. जेटली अमेरिकेत गेलेले होते तरीही त्यांनी अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आणि आपलं नाव माध्यमात कायम चर्चेत राहिल याची दक्षता घेतली. आपल्या नव्या ब्लॉगमध्ये त्यांनी राहुल गांधींना चक्क नापास विद्यार्थ्याची उपमा  दिली आहे.

राफेल, घटनात्मक संस्थांची स्वायतत्ता आणि जीएसटी अशा अनेक मुद्यांवर जेटलींनी आपलं मत व्यक्त केलं. ते आपल्या ब्लॉगमध्य म्हणाले, "गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसने अनेक खोट्या गोष्टींचा प्रचार केला, मोहिमा राबविल्या. मात्र सत्य हे अखेर सत्यच राहतं. कितीही खोटा प्रचार केला तरी सत्य लपून राहात नाही." अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली.

भारताची संरक्षण क्षमता वाढविण्यासाठी राफेलचा करार हा महत्त्वाचा आहे. या करारामुळे सरकारचा पैसाही मोठ्या प्रमाणावर वाचला आहे. असं असतानाही दररोज खोटे आरोप करण्यात येत आहेत. राफेल करारावरून राहुल गांधींची दोन वक्तव्य जरी ऐकली तर ते पंतप्रधान मोदींवर वयक्तिक आकसातून आरोप करत असल्याचं स्पष्ट होतं.

शळेत नापास विद्यार्थी हा कायम टॉपर विद्यार्थ्याला शिव्या घालत असतो. तसाच हा प्रकार असल्याचा टोलाही त्यांनी राहुल गांधी यांना लगावला. या आधीही जीएसटी, नोटबंदी, घटनात्मक संस्था, असहिष्णुता अशा अनेक मुद्यांवर काँग्रेसने खोटा प्रचार केला असा आरोपही जेटली यांनी आपल्या ब्लॉगमधून केला आहे.

First published: February 10, 2019, 6:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading