जेटलींची अनोखी बाजू! स्वत:ची मुलं जिथं शिकली तिथंच कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही दिलं शिक्षण

जेटलींची अनोखी बाजू! स्वत:ची मुलं जिथं शिकली तिथंच कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही दिलं शिक्षण

भारताचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना आपल्या मुलांप्रमाणेच परदेशातही शिक्षण दिलं. एका मुलाला त्यांना स्वत:ची कार भेट म्हणून दिली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : भारताचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं शनिवारी निधन झालं. त्यांनी फक्त आपल्याच पक्षात नाही तर विरोधी पक्षावरही छाप पाडली होती. एक निष्णात वकील, वक्ता आणि मंत्री राहिलेल्या अरुण जेटली यांनी सर्वांचा नेहमीच आदर राखला. त्यांनी पदाचा मोठेपणा न मिरवता सोबतच्या कर्मचाऱ्यांचादेखील सन्मान केला. घरी काम करणाऱे कर्मचारी ते ड्रायव्हर यांनाही कुटुंबातीलच एक भाग मानलं होतं.

जेटलींचे सचिव ओम प्रकाश शर्मा यांनी एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केला होता. अरुण जेटलींनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना आपल्या स्वत:च्या मुलांसोबत शिकवलं. चाणक्यपुरी इथल्या कॉन्वेंट स्कूलमध्ये जेटलींच्या मुलांचं शिक्षण झालं तिथंच कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही शिक्षण दिलं. एवढंच नाही तर एखाद्या कर्मचाऱ्याच्या मुलाला परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला परदेशाही पाठवलं. त्यांच्या घरातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी जेटलींनी घेतली होती.

अरुण जेटलींच्या कुटुंबात स्वयंपाक घरातील सर्व व्यवस्था सांभाळणाऱ्या जोगेंद्र यांच्या दोन्ही मुली लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. संसदेत जेटलींसोबत नेहमी असणाऱ्या गोपाल भंडारी यांची मुलं डॉक्टर आणि इंजिनिअर झाली आहेत.

आर्थिक परिस्थिती कठीण असतानाही शिक्षणाची आस असलेल्या मुलांना पाहून जेटली प्रभावित व्हायचे. मुलांची शिकण्याची जिद्द पाहून त्यांना हवी ती मदत करण्याचा प्रयत्न ते करायचे. 2005 मध्ये त्यांनी सहायकाचा मुलगा कायद्याचं शिक्षण घेत असताना आपली स्वत:ची कार गिफ्ट दिली होती.

नाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO

First Published: Aug 25, 2019 11:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading