काश्मीरप्रश्नी चीन-पाकची मागणी UNSCनं ऐकली, आज 'बंद खोलीत' होणार बैठक

काश्मीरप्रश्नी चीन-पाकची मागणी UNSCनं ऐकली, आज 'बंद खोलीत' होणार बैठक

मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरमधून कलम 370 (Article 370) रद्द केल्यानंतर आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) यावर बैठक होणार आहे. या बैठकीची मागणी चीननं केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू-काश्मीरमधून कलम 370 (Article 370) रद्द केल्यानंतर आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) यावर बैठक होणार आहे. या बैठकीची मागणी चीननं केली आहे. पाकिस्ताननं देखील दोन दिवसांपूर्वी या मुद्यावर तातडीची बैठक बोलवण्याची मागणी केली होती. मिळालेल्या वृत्तानुसार, ही बैठक एका बंद खोलीत होणार आहे. यासाठी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पोलंडकडून सकाळी 10 वाजताची वेळ देण्यात आली आहे.

बंद खोलीत होणार बैठक

सुरक्षा परिषदेत काश्मीर प्रश्नावर होणारी चर्चा दुर्मिळ घटना असल्याचं म्हटलं जात आहे. कारण यापूर्वी या मुद्यावर क्वचितच चर्चा झाल्याची माहिती आहे. 1965 साली झालेल्या सुरक्षा परिषदेत यावर चर्चा झाली होती. दरम्यान, आज होणारी बैठक पूर्ण स्वरुपाची असणार नाही. कारण ही बैठक बंद खोलीत होत आहे.

(वाचा :देशाला मिळणार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ : 'या' व्यक्तीचं नाव आहे सर्वात पुढे)

चीनच्या मागणीवर बैठक

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, कलम 370 रद्द केल्यापासून काश्मीर मुद्यावर बैठक बोलावण्याची मागणीनं जोर धरला आहे. सुरक्षा परिषदेच्या अजेंडामध्ये समाविष्ट असलेल्या 'भारत-पाकिस्तान प्रश्नावर' बंद खोलीत चर्चेची चीननं मागणी केली. जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा भारतानं रद्द केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यासाठी पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणजे पाकनं सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षांना यासंदर्भात पत्र देखील लिहिलं. यानंतर चीनच्या मदतीनं काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न पाकनं सुरू केला आणि अखेर चीननं यावर बैठकीची मागणी केली.

(वाचा : मुकेश अंबानी झाले आणखी श्रीमंत, संपत्तीत दोन दिवसांत झाली 29 हजार कोटींची वाढ)

UNSCला पाकिस्ताननं लिहिलं पत्र

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर शत्रूराष्ट्र पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. यावर पाकनं मंगळवारी UNSCला तातडीची बैठक बोलण्याची मागणी केली. यासंदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता.

(वाचा :कंपनीचा टार्गेट राहिला अपूर्ण, मालकानं कर्मचाऱ्यांना पाजलं मासे-कोंबड्यांचं रक्त)

पोलंडकडून पाकिस्तानला सडेतोड उत्तर

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार केल्यानंतर पाकिस्तान वारंवार याप्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःच्या बाजूनं मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकनं हा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही (UNSC)नेला. पण UNSCचे अध्यक्ष पोलंडकडून स्पष्ट शब्दांत पाकची कानउघाडणी करण्यात आली. या समस्येचं निराकरण द्विपक्षीय स्तरावरच होऊ शकते, असं पाकला सांगण्यात आलं.

SPECIAL REPORT : वाण नाही पण गुण लागला, या बोकड्याला रोज लागतो खर्रा!

Published by: Akshay Shitole
First published: August 16, 2019, 10:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading