मोदी सरकारची जागा जेलमध्ये -वंझारा

मोदी सरकारची जागा जेलमध्ये -वंझारा

 • Share this:

narendra modi03 सप्टेंबर : गुजरातचे आयपीएस अधिकारी डी. जी. वंझारा यांच्या राजीनामा दिल्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी अडचण निर्माण केलीय. आमची गरज संपली आणि आम्हाला अटक झाली. त्यानंतर कुणालाही आमची काळजी नव्हती. आम्ही कसे आहोत, याची साधी विचारपूसही कुणी केली नाही. या अनैतिक सरकारनं गांधीनगरमध्ये राहण्याचा हक्क गमावलाय.या सरकारची जागा तळोजा सेंट्रल जेल किंवा साबरमती सेंट्रल जेलमध्येच आहे अशी टीका वंझारा यांनी केली.

 

तसंच आम्ही सरकारच्या सांगण्यानुसारच काम केलं, पण आता स्वतःचा बचाव करण्यासाठी मोदी आणि त्यांचे सहकारी अमित शहा माझा आणि इतर पोलीस अधिकार्‍यांचा बळी देत आहेत, असा खळबळजनक आरोपही वंझारा यांनी केलाय. तसंच त्यांनी आपल्या राजीनाम्या पत्रात मोदींवर आरोप केलेत.

 

वंझारा हे देशातल्या अत्यंत वादग्रस्त पोलीस अधिकार्‍यांपैकी एक आहेत. आधी मोदींच्या जवळचे मानले जाणारे वंझारा आता मोदींचे विरोधक बनलेत. त्यांनी राजीनामा देताना मोदींवर तोफ डागलीये आणि त्यांच्या अडचणी वाढवल्या आहे. सोहराबुद्दीन, तुलसीराम प्रजापती आणि इशरत जहाँ या गुजरातमधल्या 3 वादग्रस्त चकमक प्रकरणातले वंझारा हे आरोपी आहेत.

डी. जी. वंझारा यांनी आपल्या राजीनामा पत्रात काय लिहिलंय?

 • - गुजरात व्यतिरिक्त इतर कुठल्याही राज्यात इतक्या मोठ्या संख्येनं पोलीस अधिकार्‍यांना इतक्या प्रदीर्घ काळासाठी तुरुंगात ठेवण्यात आलेलं नाही.
 • - जेव्हा जेव्हा या सरकारवर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा मी आणि माझे अधिकारी या सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलो.
 • - हे सरकार आम्हाला वाचवू इच्छित नाही. इतकंच नाही, तर स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी मला आणि माझ्या अधिकार्‍यांना तुरुंगातच कसं ठेवता येईल, यासाठी हे सरकार सर्व प्रयत्न करतंय
 • - जेव्हा अमित शहाला अटक झाली, तेव्हाच हे सरकार जागं झालं आणि (त्याला वाचवण्यासाठी) प्रामाणिकपणे प्रयत्न करू लागलं.
 • - या सरकारनं आम्हाला दगा दिला, आम्हाला वार्‍यावर सोडलं
 • - अमित शहा पूर्णपणे आत्मकेंद्री आहे आणि हे त्याने स्वतःच सिद्ध केलंय
 • - 2002 ते 2007 या काळात अधिकार्‍यांनी सरकारच्या धोरणानुसारच कारवाई केली
 • - जेव्हा गुजरात जिहादी दहशतवादाच्या आगीत होरपळत होतं, तेव्हा मला गांधीनगरमधल्या मोठ्या असामींचे रोज डझनभर फोन यायचे.
 • - आमची गरज संपली आणि आम्हाला अटक झाली. त्यानंतर कुणालीही आमची काळजी नव्हती. आम्ही कसे आहोत, याची साधी विचारपूसही कुणी केली नाही.
 • - या अनैतिक सरकारनं गांधीनगरमध्ये राहण्याचा हक्क गमावलाय.
 • - या सरकारची जागा तळोजा सेंट्रल जेल किंवा साबरमती सेंट्रल जेलमध्येच आहे.
 • - दिल्लीकडे कूच करण्याची घाई असलेल्यांना (मोदींना) तुरुंगात असलेल्या पोलीस अधिकार्‍यांचं कर्ज फेडण्याचा विसर पडलाय.
 • - ज्या नरेंद्र मोदींना मी देवाप्रमाणे मानायचो, त्यांच्यावर असलेल्या परमोच्च श्रद्धेमुळे आणि आदरामुळे मी इतक्या प्रदीर्घ काळ मौन बाळगलं.
 • - पण, त्यांच्या डोळ्यांवर पडदा टाकणार्‍या अमित शहा यांच्या दुष्ट प्रभावामुळे माझा देव माझ्यामागे उभा राहू शकला नाही.

या सर्व प्रकरणावरून काही महत्त्वाचे प्रश्न

 •  - वंझारांचं पत्र नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अमित शहा यांना अडचणीत आणेल का?
 •  - अमित शहांपासून मोदी आपले हात झटकू शकतील का?
 •  - जर वंझारांवर अन्याय झालाय तर ते एवढे वर्ष गप्प का होते?
 •  - आज वंझारांचं पत्र प्रसिद्ध होणं आणि काँग्रेसनंही आजच बनावट चकमकींचा मुद्दा काढणं हा निव्वळ योगायोग आहे का?
 •  - बनावट चकमकींच्या मुद्द्यामुळं मोदींच्या राष्ट्रीय पातळीवरच्या आकांक्षा अडतणीत येतील का?

First published: September 3, 2013, 10:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading