मुंबईत रेल्वे स्टेशनवर अपघात हमालांचा तुटवडा

30 जानेवारी, मुंबई गोविंद तुपे दिवसेंदिवस मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरच्या अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या अपघातग्रस्तांना उचलण्यासाठी लागतात ऍक्सिडंट हमाल. पण म् मुंबईतल्या पन्नास टक्के रेल्वे स्टेशनवर अपघात हमालच नाहीयेत. त्यामुळे अपघातग्रस्तांना वैद्यकीय सुविधा मिळत नाही. वेळप्रसंगी अपघातग्रस्त रेल्वेप्रवाशांच्या जीवावर बेततं. मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवर स्ट्रेचर आणि त्याच्या बाजूला बसलेले हमाल आपण नेहमीच पाहतो. अपघात झालेल्या प्रवाशांना उचलणं.. त्यांना ऍम्ब्युलन्स वा टॅक्सीत ठेवण्याचं काम हे अपघात हमाल करतात. गुलाब शेख आणि जुनैद हे दोघं सायन स्टेशनमध्ये अपघात हमालाचं काम करताहेत. " ऑन ड्युटी अपघात मॅन सब तुरंत स्टेशन मास्तर के कार्यालय में पहुंच जाईए.. " असं रेल्वेच्या रेडिओवरून ऐकू आलं की , गुलाब शेख आणि जुनैद धावतात स्टेशन मास्तरच्या ऑफिसात. कारण त्यांना माहीत असतं की कोण्या प्रवाशाचा अपघात झाला असेल. " स्टेशनात अपघात झाला की आम्हाला जावं लागतं. अशा हमालीचे आम्हाला नीट पैसे मिळत नाहीत. आम्हाला रहायला जागा नाही की डोकं टेकसयला हक्काचं छप्पर, " अशी कैफियत गुलाब शेखनं सांगितली. गुलाब शेख मूळचा उत्तरप्रदेशातल्या अलाहाबादचा. 10 वर्षांपूर्वी तो मुंबईत आला. सायन रेल्वे स्टेशनच्या हद्दीत रेल्वे ट्रॅकवर अपघात झाला तर गुलाबला जावं लागतं. गुलाब सारखीच जुनैदचीही परिस्थिती आहे. या अपघात हमालांना अधिकृत बिल्ला नसतो.ते हमालाचे लाल डगला घालत नाहीत. हमालांची भरती थेट रेल्वे करते. भरतीत ते नापास झाले की मग ते काम करतात अपघात हमाल म्हणून. प्रत्येक अपघाताच्या वेळेस स्ट्रेचर वाहून न्यायला त्यांना साठ रुपये मिळतात. सायन रेल्वे स्टेशनात तीन दिवसातून एक अपघात नक्की होतो..प्रत्येक रेल्वे स्टेशनवर किमान आठ तरी अपघात हमाल असतात. मुंबईत सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर रेल्वे मिळून 105 रेल्वे स्टेशन्स आहेत.त्यावर अंदाजे अडिचशे ऍक्सीडंट हमाल आहेत. त्यांना अपघाताच्यावेळी प्रवाशांना उचलण्याशिवाय इतरही कामं रेल्वे देतं. " अपघातग्रस्त लोकांना उचलण्याव्यतिरिक्त आम्हाला रेल्वेची इतरही कामं करावी लागतात, " असं जुनैद म्हणाला. " या अपघात हमालांना गटार काढण्याचं, पटरी साफ करम्याचं काम देतो. त्याचा दिवसाचा त्यांना दोनशे रूपये मोबदला देतो, " अशी माहिती रेल्वे स्टेशन अधिक्षक ममता कुलकर्णी यांनी दिली. पण मुंबईतील्या 50 टक्के रेल्वे स्टेशनवर अपघात हमालच नाहीयत. लायस्न्स हमाल हे काम करण्यास तयार नसतात. त्यामुळं प्रसंगी रेल्वे स्टेशनवरच्या गर्दुल्ल्यांना पोलीस स्ट्रेचर उचलायला लावतात. अपघात झाल्यानंतर ताबडतोब मेडिकल ट्रिटमेंट मिळाली तर जीव वाचू शकतो असं मेडिकल सायन्स सांगतं. मुंबईच्या रेल्वे अपघातांमध्ये रेल्वे स्टेशनवरचा अपघात हमाल हा महत्वाचा घटक आहे.. मुंबईतल्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर एक तर हमाल ठेवा मुबई हाय कोर्टाने आदेश दिला होता पण अजूनही मुंबईतल्या पन्नास टक्के रेल्वे स्टेशनवर असे हमाल नसल्याचं रेल्वेचे अधिकारीच सांगतात. त्यामुळे अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीला उचलण्यासाठी हमालाला शोधण्यात वेळ जातो. त्यात बर्‍याच जणांना आपला जीव गमवावा लागतो.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2009 08:12 AM IST

ताज्या बातम्या