भटकळला 12 दिवसांची NIA कोठडी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2013 07:43 PM IST

Image img_232082_bhatkal_240x180.jpg30 ऑगस्ट : पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असलेला इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासीन भटकळला 12 दिवसांची एनआयए (NIA)कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला आज दिल्लीच्या पटीयाला हाऊस कोर्टात हजर केलं.

त्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी त्याची पाटण्यामधल्या मिलिटरी पोलीस कॅम्पमध्ये चौकशी झाली. त्यावेळी त्यानं अनेक स्फोटांची कबुली दिली. देशभरात झालेल्या स्फोटांमध्ये आपला हात असल्याचा स्पष्ट कबुली दिलीय. देशभरात जे स्फोट घडवून आणले त्याबद्दल आपल्याला पश्चाताप नाही असा आवही त्याने आणला. मात्र, बोधगया इथं झालेल्या साखली स्फोटात हात नसल्याचं त्यांनी सांगितलं.

बिहारमध्ये बोधगया येथील महाबोधी मंदिरात कमी तीव्रतेचे 10 स्फोट झाले होते. या स्फोटांचा संशय इंडियन मुजाहिद्दीनवर होता. गुरूवारी यासीन भटकळला अटक केल्यानंतर आज त्याची चौकशी सुरू झालीय यावेळी त्यांनी ही कबुली दिली. अटक झाल्यानंतर भटकळला पाटण्यामधल्या मिलिटरी पोलीस कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथं त्याची चौकशी झाली. आता भटकळ दिल्लीत एनआयएच्या ताब्यात आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2013 07:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...