कुख्यात दहशतवादी यासीन भटकळला अटक

कुख्यात दहशतवादी यासीन भटकळला अटक

  • Share this:

bhatkal29 ऑगस्ट : इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक, कुख्यात दहशतवादी यासीन भटकळला अटक करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश मिळालंय. इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यासिनला बिहारमध्ये नेपाळच्या सीमेवरुन सौनाली या गावातून अटक करण्यात आली.

त्याच्यासोबत इंडियन मुजाहिद्दीनचा आणखी एक दहशतवादी असादुल्लाह अख्तर यालाही अटक करण्यात आलीये. अख्तर हा एनआयएए च्या यादीतला पहिल्या दहा मोस्ट वॉन्टेडपैकी एक होता. पुणे, मुबंई, हैदराबाद, बंगळुरू, सुरत, वाराणसी या शहरांमध्ये झालेल्या 10 बाँबस्फोटांमध्ये यासिन भटकळ आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग होता.

गेली पाच वर्षे पोलीस त्याच्या मागावर होते. लष्करे तोयबाचा भारतातला म्होरक्या अब्दुल करीम टुंडा याला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली. त्यानंतर भटकळच्या हालचालींची माहिती पोलिसांना दिली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. यासिन भटकळची ओळख पटवण्यासाठी चाचण्या केल्या जातील असं सांगण्यात आलंय.

कोण आहे यासीन भटकळ?

- बंदी असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक

- मूळ नाव : सय्यद अहमद जरार सिदीबापा

- मूळ गाव : कर्नाटकातील उत्तर कन्नड

- NIA च्या मोस्ट वाँटेड यादीतला महत्त्वाचा अतिरेकी

- हैदराबादच्या दिलसुख नगरमधल्या दुहेरी बॉम्बहल्ल्यात सहभागी

- 2010 : बंगलोरमधील चिन्नस्वामी स्टेडियम स्फोटात सहभाग

- दिल्ली हायकोर्टात 7 सप्टेंबर 2011 ला झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग

- मुंबईत 7/13 ला झालेल्या स्फोटातील महत्वाचा आरोपी

- पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला महत्त्वाचा आरोपी

- 2012 ला जंगली महाराज रोडवर झालेल्या स्फोटात सहभाग

First published: August 29, 2013, 3:43 PM IST

ताज्या बातम्या