'ती' मुलगी मनोरुग्ण, बापूच्या पुत्राचा उलटा आरोप

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2013 05:32 PM IST

'ती' मुलगी मनोरुग्ण, बापूच्या पुत्राचा उलटा आरोप

asaram bapu son28 ऑगस्ट : लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या आसाराम बापूच्या मुलाने आपल्या वडिलांची बाजू घेत त्या पीडित मुलीलाच मनोरुग्ण ठरवलंय. 'ती' पीडित मुलगी ही मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. तीने केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहे असा उलटा आरोप आसाराम बापू यांचे सुपूत्र नारायण साई याने केला. ती मुलगी आश्रमात असताना तीची मानसिक स्थिती ठीक नव्हती या बद्दल तिच्या घरच्यांना कळवलं होतं अशी बाजूही त्यांनी मांडली.

दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे. आसाराम बापूला कडक शिक्षा करण्यात यावी अशीही मुलीच्या वडिलांनी मागणी केलीय. मंगळवारी समन्स स्विकारायला टाळाटाळ करणार्‍या आसाराम बापूने जोधपूर पोलिसांनी बजावलेलं समन्स स्विकारलं. शुक्रवारपर्यंत आसाराम बापूनं पोलिसांसमोर हजर व्हावं असं या समन्समध्ये बजावण्यात आलं आहे. तसंच पोलिसांनी बापू विरोधात लुकआऊट नोटिसदेखील बजावलीयं.

यामुळे आसाराम बापूला देशातून बाहेर जाता येणार नाहीयं.तर याच प्रकरणाच्या संदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. कायद्याचं उल्लंघन करणार्‍याविरोधात कारवाई केली जाईल असं गेहलोत म्हणालेत. तर भाजप या प्रकरणावरून राजकारण करत असल्याचा आरोपही गेहलोत यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2013 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...