S M L

जवानांच्या हत्येमागे पाकच्या स्पेशल फोर्सचा हात-अँटनी

Sachin Salve | Updated On: Aug 19, 2013 06:47 PM IST

जवानांच्या हत्येमागे पाकच्या स्पेशल फोर्सचा हात-अँटनी

ak antony19 ऑगस्ट : भारताच्या पाच जवानांनी हत्या पाकिस्तानच्या सैन्यानं केली असून पाक लष्कराच्या एका विशेष पथकाचा या हल्ल्यामध्ये हात होता असं स्पष्टीकरण संरक्षण मंत्री ए के अँटनी यांनी राज्यसभेत दिलं. या घटनेचा परिणाम नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांच्या वर्तनावर होईल असा इशाराही अँटनी यांनी पाकला दिला.

5 ऑगस्ट रोजी पाक सैनिकांनी नियंत्रण रेषेवर घुसखोरी करून गोळीबार केला होता. या गोळीबारात 5 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. याबाबत आज संरक्षण मंत्री ए के अँटनी यांनी राज्यसभेत माहिती दिली.

विशेष म्हणजे 5 ऑगस्टच्या घटनेनंतर अँटनींनी हा हल्ला पाकने केला असं स्पष्टीकरण दिलं नव्हतं त्यामुळे विरोधकांनी अँटनींवर जोरदार हल्ला चढवला होता. अखेर अँटनींनी हा हल्ला पाकिस्ताननेच केला असं निवेदन दिलं होतं. 5 ऑगस्टच्या घटनेनंतरही पाक सैनिकांकडून वारंवार नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरूच आहे. एव्हाना मागिल शनिवारी मध्यरात्री पाक सैनिकांनी गोळीबार केल्याची घटना घडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2013 06:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close