S M L

बिहार रेल्वे दुर्घटना :मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत

Sachin Salve | Updated On: Aug 19, 2013 06:18 PM IST

Image nitish_kumar345q_300x255.jpg19 ऑगस्ट : बिहारमधल्या सहरसा रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्यसरकारकडून प्रत्येकी दीड लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधूनही प्रत्येकी 50 हजार रूपये दिले जाणार आहेत. एकूण दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे.

 

आज सकाळी सहरसाजवळ धमाडाघाट या रेल्वे स्टेशनजवळ रूळ ओलांडणार्‍या 37 प्रवाशांना भरधाव राज्यराणी एक्स्प्रेसने चिरडले. धमाडाघाट या ठिकाणी कात्यायनी देवीचं मंदिर आहे, तिथं सध्या जत्रा सुरू आहे. त्यामुळे स्टेशनावर भरपूर गर्दी होती. रुळाच्या दोन्ही बाजूंना पाणी साठल्यामुळे इथं उतरलेले प्रवासी रुळामधून जात होते. 

त्याचवेळी पाटण्याकडे जाणारी राज्यराणी एक्सप्रेस जात होती. सहरसावर प्रत्येक रेल्वे थांबत नसली तरी इथं गाड्यांचा वेग कमी होतो. पण राज्य-राणी एक्सप्रेसचा वेग कमी झाला नाही आणि त्यामुळे रूळावरून जाणारे प्रवासी गाडीखाली आले. या अपघातानंतर संतापलेल्या जमावानं रेल्वेच्या काही कोचमध्ये जाळपोळ केली, तसंच रेल्वेच्या चालकालाही मारहाण केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2013 06:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close