नरेंद्र मोदींचे पंतप्रधानांवर टीकास्त्र

नरेंद्र मोदींचे पंतप्रधानांवर टीकास्त्र

  • Share this:

modi on pm15 ऑगस्ट : भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींनी दिलेल्या आव्हानाप्रमाणे गुजरातचे गुण गात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचा समाचार घेत 'टीकास्त्र' सोडले. पंतप्रधानांनी फक्त यूपीए सरकारचा आढावा सादर केला. त्यांनी आपल्या भाषणात फक्त एका परिवाराचा उल्लेख केला. पण भ्रष्टाचारावर एक शब्दही उच्चारला नाही अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. मोदींनी भूजमधील लालन कॉलेजच्या प्रांगणातून थेट लाल किल्ल्यावर हल्लाबोल केला.

मोदींनी आपल्या भाषणात राष्ट्रपतींच्या भाषणावरही टिप्पणी केली. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर आज संसदेचा आखाडा झालाय. राष्ट्रपतींना चिंता आहे या गोष्टीची की, विरोधक काम करू देत नाही, पण संसदेचं कामकाज चाललं पाहिजे अशी टीकाही मोदींनी केली.

भारतीय नियंत्रण रेषेवर पाक सैनिकांनी हल्ले केले त्यात आपले पाच जवान शहीद झाले. आज अपेक्षा होती की, पंतप्रधान याला कडक शब्दात उत्तर देतील पण असे झाले नाही. लाल किल्ला हा सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्याची जागा आहे. सहनशक्तीचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा, हा पाकिस्तानाच विषय नसून भारताच्या सुरक्षेचा विषय आहे. अशा वेळी पंतप्रधानांनी कडक भूमिका घ्यायला हवी होती. त्यांचा आवाज पाक सरकारपर्यंत पोहचला पाहिजे होता असंही मोदींनी म्हटलंय.

तसंच पंतप्रधानांच्या भाषणात इंदिरा गांधी, राजीव गांधी, पंडित नेहरू यांचा उल्लेख करत होते. त्यांनी सरदार वल्लभाई पटेल, लाल बहादुर शास्त्री यांचा उल्लेख का टाळला असा सवालही मोदींनी केला. तसंच भ्रष्टाचाराने देशाला ग्रासले आहे. त्यावर पंतप्रधानांनी बोलायला हवे होते. मात्र ते काहीही बोलले नाही. मंत्र्यांसोबत त्यांच्या नातेवाईकांचा काळ आलाय. सत्तेत बसलेले लोकांकडून लूट सुरू आहे. आणि ही लोकं तोंडावर बोट ठेवून देश चालवत आहे अशी घणाघाती टीकाही मोदींनी केली.

First published: August 15, 2013, 1:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading