रॉबर्ट वडरांच्या जमीन व्यवहारामुळे संसद ठप्प

  • Share this:

Image img_236592_loksabha4_240x180.jpg13 ऑगस्ट : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडरा यांचे जमीन व्यवहार काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज भाजपनं या विषयावर चर्चेची मागणी केली. पण, हा मुद्दा राज्याच्या अखत्यारित येतो, असं सांगत काँग्रेसनं चर्चा टाळली. या गदारोळामुळे लोकसभेच्या कामकाजात दोन वेळा व्यत्यय आला. या व्यवहारांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपनं केलीये.

सोनिया गांधींचे जावई राबर्ट वडरा यांच्या कथित जमीन गैरव्यवहारांवरून काँग्रेसला कोंडित पकडण्याची पुरेपूर तयारी भाजपनं चालवलीय. लोकसभेत एनडीएच्या काळातले अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी या गैरव्यवहारावर चर्चेची मागणी केली. हरियाणाचे आयएएस अधिकारी खेमका यांनी वडरांच्या जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्याच आधारावर भाजप आक्रमक आता झालीय. हरियाणातल्या काँग्रेसच्याच एका नेत्यानं याप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. हा घरचा अहेर मिळाल्यानंतर काँग्रेसनं आता आपल्या सर्व मंत्र्यांना याप्रकरणी भाष्य न करण्याची सख्त ताकीद दिली.

वडरा यांच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांचं कामकाज ठप्प झाल्यानं सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवली. अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करू, असं भाजपनं या बैठकीत सांगितलं. पण, त्यासाठी सविस्तर चर्चेची मागणी करत काँग्रेसचा संसदेतला पुढचा प्रवासही खडतरच असेल, याचे संकेत दिले.

 

First published: August 13, 2013, 4:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading