लोक सैन्यात मरण्यासाठीच जातात, बिहारच्या मंत्र्यांचं वक्तव्य

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2013 04:14 PM IST

लोक सैन्यात मरण्यासाठीच जातात, बिहारच्या मंत्र्यांचं वक्तव्य

bhim singh08 ऑगस्ट : लोक सैन्यात आणि पोलिसात मरण्यासाठीच जातात असं महाभयंकर व्यक्तव्य बिहारचे ग्रामविकासमंत्री भीम सिंग यांनी केलंय. भीम सिंग यांच्या वक्तव्यानंतर भाजपने जोरदार टीका केली. त्यांनंतर भीम सिंग यांनी माफी मागितली.

पाकिस्तान हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे, अमर रहे च्या घोषणात जवानांना अखेरचा निरोप देण्यात आला. मात्र दुसरीकडे मंत्र्यांची वादग्रस्त विधानं सुरुच आहेत. जवान शहीद होण्यासाठीच लष्करामध्ये भरती होतात, असं वादग्रस्त वक्तव्य बिहारचे ग्रामविकासमंत्री भीमसिंग यांनी केलंय.

या वक्तव्यानंतर भाजपनं जोरदार टीका केली. या टीकेनंतर भीम सिंग यांनी आपलं वक्तव्य तात्काळ मागे घेत देशाची माफी मागितली. माझं वक्तव्य पूर्ण ऐकलं नाही, असं भीमसिंग यांनी म्हटलंय.

नितीशकुमार यांनी भीमसिंग यांना चांगलेच फटकारून काढले त्यानंतर त्यांनी आपला माफीनामा सादर केला. भीम सिंग यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केला. अशा विधानामुळे जेडीयूच्या नेत्यांची मानसिकता दिसते अशी भाजपचे नेते अश्विनी चौबे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2013 03:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...