S M L

'संरक्षणमंत्री राजीनामा द्या'

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2013 03:34 PM IST

Image sanjay_rout_on_kasab_300x255.jpg07 ऑगस्ट : पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर आता विरोधकांनी संरक्षण मंत्री ए.के.अँटनी यांच्यावर एकच हल्ला चढवलाय. अँटनी यांनी देशवासीयांची माफी मागावी अशी मागणी भाजपने केलीय तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अँटनींच्या राजीनाम्याची मागणी केलीय. अँटनींनी देशाची फसवणूक केलीय. आपले पाच जवान शहीद झालेत. त्यांच्यावर गोळीबार पाक सैनिकांनी केली की दहशतवाद्यांनी केला हे स्पष्टपणे संरक्षणमंत्र्यांना सांगता येत नाहीय. 24 तासात ते माहिती देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राऊत यांनी केली.

तर संरक्षणमंत्र्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला करणारे पाक सैनिकाच होते हे स्पष्ट केलंय तर पाकला दोषी का ठरवत नाही. त्यांना दोषमुक्त का केलं जात आहे. यावर पंतप्रधानांनी निवेदन देऊन पाकिस्तान यासाठी जबाबदार आहे असं ठणकावून सांगावं अशी मागणी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. सोमवारी मध्यरात्री पूंछमध्ये हल्ल्यात दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैन्याचा वेश घालून भारतीय सैन्यावर हल्ला केला असं संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी निवेदनात म्हटलं होतं.


त्यांच्यासोबत पाकिस्तानी सैनिकही होते असं सैन्यदलातर्फे सांगण्यात आलंय. दोन्ही वक्तव्यांमध्ये विरोधाभास का, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. तर संरक्षणमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी राज्यसभेत भाजपचे नेते व्यंकय्या नायडूंनी केली. दरम्यान, संरक्षणमंत्र्यांच्या निवेदनाचे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्येही पडसाद उमटले. या गदारोळामुळे दोन्ही सभागृह 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2013 03:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close