युपीत सपाला धक्का, भाजपच्या जागा वाढणार?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2013 11:00 PM IST

युपीत सपाला धक्का, भाजपच्या जागा वाढणार?

up election25 जुलै : 2014 च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजयाला लागलेय. आज जर निवडणुका झाल्या तर उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये काय निकाल लागू शकतो याबद्दल आयबीएन नेटवर्क आणि द हिंदू यांच्यासाठी सीएसडीएसने सर्व्हे केलाय. उत्तरप्रदेश राजकीयदृष्ट्या भारतातलं सर्वांत महत्त्वाचं राज्य. युपीत मुलायम सिंग यादव आणि मायावती हे आपल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. तर नरेंद्र मोदी भाजपचे आणि राहुल गांधी काँग्रेसचे स्टार चेहरे आहे. उत्तरप्रदेशमधून संसदेत सर्वाधिक सदस्य निवडून गेले आहे. असं म्हणतात, ज्यांनी युपी जिंकली त्यांनी देशावर सत्ता गाजवलीय. जर आज निवडणुका झाल्या तर उत्तरप्रदेशमध्ये भाजपला मोठा फायदा होईल. कारण युपीची जनता आता अखिलेश यादव यांच्या सरकारवर नाराज आहे. त्यामुळे सपाला 16 ते 21 जागा मिळतील तर भाजपला 29 ते 33 जागा मिळेल आणि बसपाला 14 ते 18 जागा मिळतील. काँग्रेसला 11 ते 15 जागा मिळतील. काँग्रेसला इथे मोठा फटका बसला तर राहुल गांधींच्या महत्त्वाकांक्षांना धक्का मानला जाईल.

====================================================================

उत्तर प्रदेश

1. कोणतं सरकार चांगलं?

Loading...

अखिलेश यादव -- 26%

 मायावती -- 29%

====================================================================

2. अखिलेश यादव सरकारचं रिपोर्ट कार्ड

वाढली -- कमी झाली

गुन्हेगारी             -- 45% -- 13%

गुंडगिरी              -- 51% -- 11%

जातीय हिंसा       -- 32% -- 12%

रोजगार निर्मिती -- 20% -- 30%

====================================================================

3. मुख्यमंत्री बदलावा?

                                                   सर्व मतदार -- सपा समर्थक

मुलायम सिंहांनी सत्ता हाती घ्यावी -- 53% -- 67%

अखिलेश सिंहांनी कायम राहावं     -- 17% -- 20%

====================================================================

4. कोणता पक्ष सत्तेवर असावा?

 पक्ष -- उत्तम शासन__ उत्तम कायदा-सुव्यवस्था

भाजप -- 28%_____25%

बसपा -- 19% _____22%

सपा -- 16%______12%

काँग्रेस -- 13%_____11%

====================================================================

लोकसभेच्या जागा

भाजप -- 27% -- 29 ते 33

सपा -- 22% -- 17 ते 21

बसपा -- 21% -- 14 ते 18

काँग्रेस -- 16% -- 11 ते 15

रालोद -- 1% -- 0 ते 2

इतर -- 13% -- --

====================================================================

मतांची टक्केवारी

पक्ष -- 2009 -- जुलै 2013 -- बदल

भाजप -- 18% -- 27% -- 9%

सपा -- 23% -- 22% -- -1%

बसपा -- 28% -- 21% -- -7%

काँग्रेस -- 18% -- 16% -- -2%

रालोद -- 3% -- 1% -- -2%

इतर -- 10% -- 13% -- 3%

अनिश्चित मतदार -- 23%

====================================================================

लोकसभेच्या जागा (80)

पक्ष -- 2009 -- जुलै 2013

भाजप -- 10 -- 29 ते 33

सपा -- 23 -- 17 ते 21

बसपा -- 20 -- 14 ते 18

काँग्रेस -- 21 -- 11 ते 15

इतर -- 6 -- 0 ते 2

====================================================================

उत्तर प्रदेशचं महत्त्व

- राजकीयदृष्ट्या भारतातलं सर्वांत महत्त्वाचं राज्य

- या एकाच राज्यात लोकसभेच्या सर्वांत जास्त 80 जागा

- भाजपला केंद्रात सत्तेवर येण्यासाठी इथे सर्वांत जास्त जागा मिळवाव्या लागतील

- मुलायम सिंह आणि मायावती यांच्या पंतप्रधानपदाच्या आशा या राज्यावर अवलंबून

- काँग्रेसला इथे मोठा फटका बसला तर राहुल गांधींच्या महत्त्वाकांक्षांना धक्का मानला जाईल

====================================================================

राजस्थान

1. कोणतं सरकार चांगलं?

गेहलोत सरकार चांगलं आहे -- 29%

वसुंधरा राजे सरकार चांगलं होतं -- 35%

====================================================================

2. गेहलोत सरकारचं रिपोर्ट कार्ड

सुधारली -- बिघडली

रस्त्यांची अवस्था -- 31% -- 35%

पाणीपुरवठा -- 24% -- 43%

शेतकर्‍यांची अवस्था -- 18% -- 42%

रोजगार संधी -- 21% -- 35%

====================================================================

3. गेहलोत सरकारची कामगिरी

2011 -- 2013

समाधानी -- 58% -- 65%

असमाधानी -- 26% -- 23%

====================================================================

कौल राजस्थानचा : आज निवडणुका झाल्या तर...

पक्ष -- मतांची टक्केवारी -- लोकसभेच्या जागा

काँग्रेस -- 44% -- 10 ते 14

भाजप -- 44% -- 10 ते 14

बसपा -- 3% -- --

इतर -- 9% -- 0 ते 2

====================================================================

मतांची टक्केवारी

पक्ष -- 2009 -- जुलै 2013 -- बदल

काँग्रेस --47% -- 44% -- -3%

भाजप --37% -- 44% -- 7%

इतर --16% -- 12% -- -4%

====================================================================

मध्य प्रदेश

1. कोणतं सरकार चांगलं?

सर्व मतदार -- काँग्रेस समर्थक

शिवराज चौहान -- 75% -- 56%

दिग्विजय सिंह -- 8% -- 21%

====================================================================

2. शिवराज चौहान सरकारची कामगिरी

2011 -- 2013

समाधानी -- 75% -- 82%

असमाधानी -- 12% -- 7%

====================================================================

3. कोण अधिक चांगला पंतप्रधान होईल?

शिवराज चौहान -- 49%

नरेंद्र मोदी -- 28%

====================================================================

कौल मध्य प्रदेशचा

पक्ष -- मतांची टक्केवारी -- लोकसभेच्या जागा

भाजप -- 50% -- 21 ते 25

काँग्रेस -- 32% -- 2 ते 6

बसपा -- 6% -- 0 ते 4

इतर -- 12% -- --

====================================================================

मतांची टक्केवारी

पक्ष -- 2009 -- जुलै 2013 -- बदल

भाजप -- 43% -- 50% -- 7%

काँग्रेस -- 40% -- 32% -- -8%

बसपा -- 6% -- 6% -- 0

अनिश्चित मतदार -- 15%

====================================================================

लोकसभेच्या जागा (29)

पक्ष -- 2009 -- जुलै 2013

भाजप -- 16 -- 21 ते 25

काँग्रेस -- 12 -- 2 ते 6

बसपा -- 1 -- 0 ते 4

====================================================================

असा झाला सर्व्हे

  • सर्व्हे कुणी केला?
  • - 'सेंटर फॉर द स्टडीज ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज' (CSDS) या संस्थेच्या 'लोकनीती' या संशोधन शाखेने

  • सर्व्हे कुणाचा केला?
  • - देशभरातल्या 19,062 मतदारांच्या मुलाखती त्यांच्या घरी घेतल्या गेल्या
  • - यामध्ये 54% पुरुष, 44% महिला मतदारांचा समावेश
  • - यामध्ये 20% दलित, 11% मुस्लिम, 10% आदिवासी मतदारांचा समावेश
  • - यामध्ये 76% ग्रामीण, 24% शहरी मतदारांचा समावेश
  • - कुणाला मत देणार, हा प्रश्न गुप्त मतदान पद्धतीने विचारण्यात आला

सर्व्हे कुठे केला?

- मुख्य राज्यांमधल्या 267 लोकसभा मतदारसंघांमधल्या 1120 ठिकाणी

- PPS या शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर करून ठिकाणांची निवड

सर्व्हे कधी केला?

- जुन अखेरचा आठवडा ते जुलै पहिला आठवडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2013 10:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...