फ्रायडे रिलीज

फ्रायडे रिलीज

23 जानेवारी, मुंबईया वीकेन्डला भरपूर सिनेमे रिलीज झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ' स्लमडॉग मिलेनियर '. गोल्डन ग्लोब ऍवॉर्ड मिळाल्यानंतर स्लमडॉग मिलेनियरला ऑस्करसाठी 10 नामांकनं मिळालीयत. पुन्हा एकदा रेहमानला म्युझिकसाठी ऑस्करमध्ये नामांकन मिळालंय. आणि या सिनेमाची हिंदी आवृत्ती स्लमडॉग करोडपतीही रिलीज होतोय. याशिवाय बहुचर्चित ' देशद्रोही 'ही याच आठवड्यात रिलीज होतोय.आणि ' राज द मिस्ट्री कन्टिन्युज ' म्हणजे राजचा सिक्वलही पाहता येईल.चार गोल्डन ग्लोब ऍवॉर्डचा मानकरी ठरलेला स्लमडॉग मिलेनियर हा या आठवड्यातला मोठा सिनेमा आहे. कारण या सिनेमाला ऑस्करसाठी 10 नामांकनंही जाहीर झाली आहेत. झोपडपट्टीत राहणारा जमाल मलिक ' कौन बनेगा करोडपती 'मध्ये भाग घेतो आणि जिंकत जातो. दोन कोटी रुपये जिंकण्यासाठी एक प्रश्नच बाकी असताना त्याच्या आयुष्यात बर्‍याच नाट्यमय घटना घडतात. अनिल कपूर, इरफान खान, महेश मांजरेकर असे बॉलिवूड कलाकार या हॉलिवूड सिनेमात आहेत. जमालच्या भूमिकेत देव पटेल आहे, तर आयुष खेडेकरनं छोट्या जमालची भूमिका केलीय. या सिनेमाच्या म्युझिकसाठी गोल्डन ग्लोब मिळवून रेहमाननं जगभरातली आपली लोकप्रियता सिद्ध केलीय. या सिनेमाची इंग्रजी आवृत्ती स्लमडॉग करोडपतीही रिलीज होतेय. ' राज द मिस्ट्री कन्टिन्युज ' म्हणजे सुपरहिट ' राज 'चा दुसरा भाग. भट्ट कँपचाच हा सिनेमा. इमरान हाश्मी आणि कंगना राणावत मुख्य भूमिकेत आहेत. अध्ययन सुमन हा शेखर सुमनचा मुलगा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या रहस्यमय प्रेमकथेचं दिग्दर्शन केलंय मोहीत सुरीनं. हा भयपट असल्याचा दावा मुकेश भट्टनं केलाय. आता हा सिनेमा प्रेक्षकांना किती घाबरवतोय ते त्यांचं त्यांनीच ठरवावं. ' देशद्रोही ' सिनेमा सरतेशेवटी रिलीज होतोय. खरं तर त्याच्यावर सुरुवातीला घालण्यात आलेल्या बंदीमुळेच तो जास्त गाजला. मुख्य भूमिकेत कमाल रशिद खान आहे आणि तोच दिग्दर्शक, निर्माताही आहे. मराठी आणि उत्तर भारतीय वादावर हा सिनेमा आहे. हॉलिवूडचा सिनेमा ' मॅरिड लाइफ ' या आठवडयात रिलीज होतोय., इरा सॅचेचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा जॉन बिंघमच्या 1953मधल्या रॉन्देवुज हेवन या कादंबरीवर आधारलेला आहे . ख्रिस कूपर, पिअर्स ब्रॉसन , पॅट्रिशिया क्लार्कसन आणि रचेल मॅकऍडमस् यांच्या सिनेमात मुख्य भूमिका यात आहेत. हा सिनेमा म्हणजे एक भावनाट्य आहे.या आठवड्यात मराठी सिनेमा काही रिलीज होत नाहीये. या वीकेण्डला ऑप्शन तर बरेच आहेत..पण प्रेक्षकांची पसंती स्लमडॉग मिलेनियरलाच असेल असं दिसणारंय.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2009 08:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading