'मोदींनी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या स्पष्ट करावी'

'मोदींनी धर्मनिरपेक्षतेची व्याख्या स्पष्ट करावी'

  • Share this:

digi on modi15 जुलै : भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांनी पुण्यामध्ये तीन वेगवेगळ्या भाषणांमध्ये काँग्रेस आणि यूपीएच्या कारभारावर टीका केली होती. यावर राज्यातल्या नेत्यांनंतर आज काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी उत्तर दिलं. मोदींना सेक्युलरीझम बद्दल काय वाटतं. धर्मनिरपेक्षता म्हणजे हे काय अगोदर मोदींनी सांगितलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी आपली धर्मनिरपेक्षतेची व्याख्या स्पष्ट करावी असं आव्हान काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी दिलं. धार्मिक, जातीय विषयांवर मत मागण्यासाठी वापर होऊ नये असा टोलाही दिग्विजय सिंग यांनी लगावला.

तर नेते अजय माकन यांनी मोदी यांच्यावर थेट हल्ला करत, त्यांच्या गुजरात विकासाच्या दाव्यालाच आव्हान दिलं. मोदींनी यूपीएच्या कारभारावर बोलण्या आधी एनडीएच्या काळात काय काम केलं हेही लक्षात घ्यावं. वाटलं तर त्याचा नीट अभ्यास करावा आणि मग आरोप करावा. गुजरातमध्ये त्यांच्या कार्यकाळात काय विकास झाला आणि एनडीएच्या काळात काय झाला याचंही मोजमाप झालं पाहिजे असा सल्लाही माकन यांनी दिला.

'मोदी बोलल्याचा काँग्रेसलाच होतोय फायदा'

तर यशवंत सिन्हा यांनी मोदींना घरचा आहेर दिला. मोदी विरोधकांचा डाव स्पष्ट आहे. मोदी जितकं अधिक बोलतील तितका वाद निर्माण करतील. त्यामुळे चर्चेचा केंद्रबिंदू गैरकारभार आणि भ्रष्टाचाराकडून 11 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये काय घडलं होतं, तिकडे वळेल. काँग्रेसला अजेंडा बदलू देणं आणि स्वतःच्या अटीवर चर्चा लादू देणं ही घोडचूक ठरेल असा अहेरचा सिन्हा यांनी दिला.

First published: July 15, 2013, 2:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading