'होय, मी हिंदू राष्ट्रवादी'

'होय, मी हिंदू राष्ट्रवादी'

  • Share this:

Image img_234392_narendramodibjp34_240x180.jpg12 जुलै : होय, मी हिंदू राष्ट्रवादी आहे आणि यात काहीच चुकीचं नाही अशी स्फोटक मुलाखत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलीय. 2002 च्या दंगलीत आपण काहीच चुकीचं केलं नाही, असंही मोदींनी स्पष्ट केलंय.

काही चुकीचं केलं तरच आपल्याला अपराधी वाटेल, असंही मोदींनी म्हटलंय. 2002 दंगलीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या एसआयटीनं आपल्याला क्लीन चीट दिल्याचं त्यांनी सांगितलंय. लोकांना टीका करण्याचा अधिकार आहे. काही वाईट घडलं तर माणूस म्हणून मला वाईट वाटतं, असंही मोदींनी मत व्यक्त केलं.

 

 

या मुलाखतीतला काही भाग

प्रश्न : लोक आज पण आपल्याला 2002 दंगली प्रकरणी दोषी धरतात, आपल्याला अडचण येत नाही का?

मोदी : लोकांना बोलण्याचा अधिकार आहे. हा लोकशाहीचा देश आहे. इथं प्रत्येका आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मला अडचण जेंव्हा होते तेंव्हा मी काही चुकीच केलं. अडचण जेंव्हा होते तेंव्हा आपण चोरी करत आहोत आणि पकडले गेलोत. माझ्या बाबतीत असं नाही.

प्रश्न : जे काही झाले त्याबद्दल आपल्याला पश्चाप होत नाही का?

मोदी : मी तुम्हाला सांगतो, आपलं सुप्रीम कोर्ट देशातील सर्वोच्च आहे. गुजरात दंगली प्रकरणी कोर्टाने एसआयटीकडे तपास दिला. तपासाचा अहवाल आला त्यात मला क्लिन चीट देण्यात आली. दुसरी गोष्ट अशी की, जर एखादी कार धावत आहे आणि आपण त्या कारमध्ये मागे बसला आहात आणि आपल्या कार खाली एखादा कुत्रा आला तर दुख होतं की नाही. नक्कीच दुख होतं. मी मुख्यमंत्री असो अथवा नसो पण मी एक माणूस आहे. जर कुठे काही एखादी दूखद घटना घडली तर स्वाभाविकच दुख होणारच.

प्रश्न : गुजरात दंगलीच्या वेळी आपल्या सरकारचा दृष्टीकोन वेगळा असायला हवा होता?

मोदी : मी मानतो की, परिस्थिती हाताळण्यात आम्ही पूर्ण ताकदीनं काम केलं.

प्रश्न : तुम्हाला वाटतं की तुम्ही 2002 च्या दंगलीत योग्य केलं?

मोदी : नक्कीच योग्य केलं. देवानं आपल्याला चांगली बुद्धी दिलीय. जो काही माझ्याकडे अनुभव होता आणि त्या परिस्थिती आमच्याकडे जे काही होतं त्याचा आम्ही पूर्ण वापर केला. याच गोष्टीचा एसआयटीनेही तपास केला.

प्रश्न : तुम्हाला वाटतं देशात धर्मनिरपेक्ष नेता असायला हवा?

मोदी : हो मी मानतो पण सेक्युलरीझम ची व्याखा काय आहे. माझ्यासाठी सेक्युलरीझम म्हणजे देश आहे. माझ्या पक्षाचा मुख्य उद्देश आहे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे. हे आमचं सेक्युलरीझम आहे.

प्रश्न : टीकाकार म्हणतात तुम्ही हुकुमशहा आहेत, समर्थक म्हणतात तुम्ही निर्णय घेणारे नेते आहात. वास्तवात मोदी काय आहे?

मोदी : जर तुम्ही स्वत:ला नेते समजतात तर तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी. जर तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता असेल तर तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी आहे. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. लोक आपल्याकडून अपेक्षा ठेवतात आपण निर्णय घ्यावा. तरच लोकं तुमचं नेतृत्त्व स्वीकार करतील. हे तर गूण आहे, यात नकारात्मक बाब कोणतीच नाही. दुसरी गोष्ट अशी की, जर तुम्ही हुकुमशहा आहात तर इतकी वर्ष सरकार कसं चालवलं आणि त्यात यशस्वी कसे झालात? सर्वांना सोबत घेऊन तुम्ही काम कसं केलं आणि यात यश कसं मिळवलं. म्हणून मी म्हणतो, गुजरातचा विकास हा एकट्या मोदीचा नाही तर टीम गुजरातचा आहे.

First published: July 12, 2013, 11:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading