S M L

'निर्भया'च्या मारेकर्‍याचा 25 जुलैला फैसला

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2013 03:49 PM IST

'निर्भया'च्या मारेकर्‍याचा 25 जुलैला फैसला

delhi gan rape11 जुलै : मागिल वर्षी डिसेंबर महिन्यात पूर्ण देश ढवळून निघाला, त्या निर्भयाच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातला एक महत्त्वाचा निकाल आज अपेक्षित होता. पण बाल गुन्हेगार न्यायमंडळाने तो राखून ठेवला. 23 वर्षांच्या निर्भयाचा अतिशय क्रूर पद्धतीने छळ करणारा हा आरोपी 17 वर्षांचा असल्याचं सिद्ध झाल्यामुळे त्याचा खटला बाल गुन्हेगार न्यायमंडळासमोर सुरू होता. ही सुनावणी पूर्ण झाली असून निकाल आता 25 जुलैला लागणार आहे. जर गुन्हा सिद्ध झाला, तर त्याला जास्तीत जास्त 3 वर्षांसाठी सुधारगृहात पाठवलं जाऊ शकतं.

 

याअल्पवयीन आरोपीनं महिलेला छेडलं होतं आणि तिच्यावर बलात्कार केला होता. त्याचं वय पाहता त्याला सोडून देण्यात यावं अशी मागणी काही जणांनी केली होती. तर त्याला कोणत्याही प्रकारची माफी देऊ नये आणि बलात्कार विरोधी कायद्याचा पुनर्विचार करण्यासाठी एक समिती नेमावी, असाही आग्रह काही जणांनी धरला होता. त्यानंतर बलात्काराच्या कायद्याची व्याप्ती जरी वाढली असली तरी अल्पवयीन आरोपींबाबत काहीही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळेच या खटल्यातील अन्य आरोपींची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टासमोर झाली तर अल्पवयीन आरोपीची सुनावणी अल्पवयीन कोर्टात झाली. देशभर आंदोलन झाल्यानंतर या बाल गुन्हेगारी कायद्यात कडक तरतुदी करण्याची मागणी झाली होती, पण तसा कोणताही बदल करण्यात आला नाही.आतापर्यंतचा या खटल्याचा प्रवास

16 डिसेंबर 2012 - 23 वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार आणि मारहाण

17 डिसेंबर 2012 - बस ड्रायव्हर रामसिंग आणि अन्य दोन आरोपींना अटक

Loading...

22 डिसेंबर 2012 - अल्पवयीन आरोपीसह सर्व आरोपींना अटक केल्याचं पोलिसांनी जाहीर केलं

22 डिसेंबर 2012 - 23 डिसें-दिल्लीत इंडिया गेटवर नागरिकांची निदर्शनं

29 डिसेंबर 2012 - या प्रकरणातल्या निर्भयाचं सिंगापूरमध्ये निधन

3 जानेवारी 2013 - दिल्ली पोलिसांनी 5 आरोपींवर आरोपपत्र ठेवलं

3 जानेवारी 2013 - अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी

2 फेब्रुवारी 2013 - फास्ट ट्रॅक कोर्टाने 5 आरोपींवर 13 गुन्हे निश्चित केले

5 फेब्रुवारी 2013 - सुनावणी सुरू

5 फेब्रुवारी 2013 - कोर्टात साक्षीदारांचे जबाब नोंदवायला सुरूवात

28फेब्रुवारी 2013 - अल्पवयीन आरोपीवर कोर्टाने बलात्काराचा आरोप निश्चित केला

11 मार्च 2013 - मुख्य आरोपी रामसिंगची तिहार जेलमध्ये आत्महत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2013 03:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close