Elec-widget

उत्तराखंडमध्ये अजूनही 2000 लोक अडकलेले

  • Share this:

India Floods29 जून : उत्तराखंडमधील बचावकार्य आता शेवटच्या टप्प्यात आलंय. अजूनही अडकलेल्या 2 हजार जणांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आज सकाळी हवामान स्वच्छ झाल्यानंतर हवाई बचावकार्य सुरू झालं. गोविंदघाटमध्ये नव्यानंच बांधण्यात आलेल्या फूट ब्रिजवरून बद्रीनाथमध्ये अडकलेल्या जवळपास 590 यात्रेकरूची सुटका करण्यात आली.

जोशीमठ ते गोविंदघाटचा रस्ताही आता सुरू झालाय. काही गावांचा संपर्क अजूनही पूर्णपणे तुटलेला आहे. तिथं हेलिकॉप्टरमधून औषधं आणि अन्नाची पाकिटं पुरवली जात आहे. एकीकडे बचावकार्य संपत आलंय, तर दुसरीकडे भगिरथी नदीची पाणीपातळी वाढत असल्यानं चिंता निर्माण झालीय. त्यामुळे उत्तरकाशीतल्या लोकांना दुसरीकडे हलवण्यात येतंय. पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून असल्याचं प्रशासनानं सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2013 09:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...