तरुणीच्या 'या' गुन्ह्यावरून कोर्टानं दिली 'कुराण' वाटण्याची शिक्षा

तरुणीच्या 'या' गुन्ह्यावरून कोर्टानं दिली 'कुराण' वाटण्याची शिक्षा

सोशल मीडियावरून व्यक्त होताना जबाबदारीचं भान बाळगा अशी ताकिदही कोर्टानं त्या तरुणीला दिलीय.

  • Share this:

रांची 16 जुलै : रांची कोर्टाच्या एका निर्णयाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. या कोर्टानं तरुणीला एक अनोखी शिक्षा दिलीय. ही शिक्षा आहे समाजसेवेची. या तरुणीच्या  फेसबुक पोस्टवरून धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा तिच्यावर आरोप होता. त्यामुळे पवित्र कुराणाच्या पाच प्रती वेगवेगळ्या संस्थांना वाटण्याचा आदेश देत कोर्टानं जामीन देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सोशल मीडियावरून व्यक्त होताना जबाबदारीचं भान बाळगा अशी ताकिदही कोर्टानं दिलीय.

रांचीच्या रुचा भारती या तरुणीच्या एका पोस्ट वरून वाद निर्माण झाला होता. रुचाविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रारही करण्यात आली होती. तिने जी पोस्ट टाकली होती त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या अशी तक्रार करण्यात आली होती. नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं. दोनही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले.

VIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी

तरुणी ही विद्यार्थीनी आहे. तिला भविष्यात अनेक गोष्टी करायच्या आहेत. तिचं आयुष्य खराब होऊ नये असं कोर्टाला वाटतं. त्यामुळे जबाबदारीने वागायची ताकिद देऊन न्यायाधीश मनिष सिंग यांनी तिला कुराण या धर्मग्रंथाच्या पाच प्रती शांळांच्या वाचनालयाला आणि इतर संस्थांना वाटण्याच्या आदेश दिले.

कुराणाची एक प्रत स्थानिक अंजुमन इस्लाम कमेटी ला देण्यासही कोर्टाने तिला सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप करणं, ट्रोल करणं असे प्रकार घडत आहेत त्यामुळे या शिक्षेची सोशल मीडियातून जोरदार चर्चा रंगली आहे.

कार किंवा बाइक चालवताय? मग तुम्हाला हे नवे 13 नियम माहीत हवेतच

...तर भरावा लागेल दंड

दारू पिऊन वाहन चालवत असाल तर आता तुम्हाला तब्बल 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भातील सुधारित मोटर वाहन कायदा विधेयक (Motor Vehicle Act) सोमवारी (15 जुलै) लोकसभेत सादर केलं. या विधेयकात रस्ते वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नियमांना अधिक कठोर करण्यात आलं आहे. शिवाय, वाहन चालवताना थोडासाही निष्काळजीपणा दिसून आला तर जवळपास दहापट दंड भरावा लागू शकता, असा प्रस्तवाही ठेवण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे 'ड्रंक अँड ड्राईव्ह'च्या दुर्घटनांवर आळा घालण्यासाठी शासनानं कायदा अधिक कठोर केला आहे. यानुसार, दारू पिऊन गाडी चालवल्यास तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

First published: July 16, 2019, 4:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading