मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी आनंद यादव

16 जानेवारी, औरंगाबाद82 व्या आखील भारतीय मराठी संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध समीक्षक आणि साहित्यिक आनंद यादव यांची निवड झाली आहे. हे संमेलन महाबळेश्वर येथे होणार आहे. अध्यक्षपदासाठी सुप्रसिद्ध लेखक डॉ.आनंद यादव आणि समीक्षक डॉ.शंकर सारडा शर्यतीत होते. या स्पर्धेत अखेर आनंद यादव यांनी बाजी मारली. " ही निवडणूक राजकीय स्वरुपाची नाही तर सांस्कृतिक आहे. माझं सांस्कृतिक कार्य पाहता माझी साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. माझी मतं ही स्वच्छ आहेत. मी फक्त विचारवंत आणि साहित्यिक म्हणून प्रसिद्ध नाही तर मी कवितेपासून कादंबरीपर्यंत आणि लघुनिबंधांपासून वैचारिक लिखाणपर्यंत सगळं काही केलं आहे. आतापर्यंत मला 40 पुरस्कार मिळाले आहेत. हे 40 पुरस्कार फक्त स्थानिक पातळीवरचे नाहीयेत. तर राष्ट्रीय आणि आंतराराष्ट्रीय पातळीवरचे आहेत. माझ्सा कथांचं इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच भाषेतही भाषांतर झालेलं आहे, " असं आनंद यादव म्हणाले. डॉ. आनंद यादव यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1935 साली कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल येथील अतिशय छोट्या गावात झाला. एका सामान्य शेतकरी कुटुंबात ते जन्माला आले. अतिशय कठिण परिस्थितीतून शिक्षण घेतलं. दहावीपर्यंत दुपारच्या शाळेत जाऊन त्यांना नंतर शेतावर दिवसभर राबावं लागत असे. कारण त्यांच्या वडिलांचा शिक्षणाला विरोध होता. त्या विरोधाला न जुमानता अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून आनंद यादव शिकले आणि प्राध्यापक झाले. शालेय वयापासूनच त्यांना वाचनाचं वेड होतं. त्यांच्या वयाच्या 24 व्या वर्षी 'हिरवे जग' हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. हा कविता संग्रह पु,ल.देशपांडे यांनी पुढाकार घेऊन प्रसिद्ध केला. काळी 'माती' हा त्यांचा आणखी एक कविता संग्रह. 1987 साली प्रसिद्ध झालेल्या 'झोंबी' या त्यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ही कादंबरी त्यांच्या दहावीपर्यंतच्या अनुभवावर आधारित आहे. त्याआधी त्यांची 'गोतावळा' ही कादंबरी प्रसिद्ध झाली. 'खळाळ' हा त्यांचा कथासंग्रहही प्रसिद्ध आहे. 'नांगरणी', 'घरभिंती', 'काचवेल' या त्यांच्या तीन आत्मचरित्रात्मक कादंबर्‍या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. अलिकडच्या काळात संतांची चरित्रंही लिहायला त्यांनी सुरुवात केली आहे. 'संत सूर्य तुकाराम' आणि 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही दोन चरित्र त्यांनी लिहिली. 'ग्रामीणता- साहित्य आणि वास्तव' तसंच 'मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती' ही त्यांची समीक्षात्मक पुस्तकंही प्रसिद्ध आहेत.

  • Share this:

Tags:
First Published: Jan 16, 2009 07:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading