हेलिकॉप्टर दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू

 हेलिकॉप्टर दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू

  • Share this:

2523525625623426 जून: उत्तराखंडमध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात 20 जण ठार झालेत. हेलिकॉफ्टरमध्ये शहीद झालेल्यांमध्ये हवाईदलाच्या पाच, एनडीआरफच्या नऊ आणि आयटीबीपीच्या सहा जवानांचा समावेश आहे. शहिदांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी हवादलप्रमुख एअर चीफ मार्शल एनएके ब्राउनी हे गौरीकुंडला रवाना झालेत. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडलाय. तो तपासणीसाठी चंदिगडला पाठवण्यात येतोय. त्यानंतर अपघाताचं कारण समजू शकेल. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे एमआय-17 जातीचं होतं, ते गौरीकुंडजवळ कोसळलं होतं. त्यात हवाई दल, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीबीपी (ITBP) आणि नॅशल डिझास्टर रेस्क्यू फोर्स म्हणजेच एनडीआरए (NDRF) चे जवान होते. गौचरहून या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं आणि ते गौरीकुंडच्या दिशेनं जात होतं. ते का कोसळलं याचं कारण अजूनही समजलेलं नाहीय. पण ते दाट धुक्यांमुळे कोसळलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातले दोन जवान शहीद

हेलिकॉप्टर दुर्घटनेत धुळ्याचे शशिकांत पवार आणि जळगावचे गणेश अहिरराव अशी या दोन्ही जवानांची नावं आहेत. धुळ्यातल्या बेटावद येथे राहणारे शशिकांत पवार हे एनडीआरएफचे जवान होते. तर शहीद गणेश अहिरराव हे चाळीसगाव जिल्हयातील वडाळा वडाळी गावचे रहिवासी आहेत. ते दहा वर्षांपूर्वी एनडीआरफमध्ये भरती झाले होते. या दोघांचं पार्थिव दुपारपर्यंत राज्यात आणलं जाण्याची शक्यता आहे.

First published: June 26, 2013, 2:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading