केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देणार 'या' सात प्रश्नांना प्राधान्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देणार 'या' सात प्रश्नांना प्राधान्य

Amit Shah take charge as home minister : गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताच अमित शहा घेणार काही मोठे निर्णय.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जून : अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर त्यांच्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. यापूर्वी हेच खातं राजनाथ सिंह यांच्याकडे होतं. पण, अमित शहा यांच्यापुढे आता काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आता अमित शहा काही महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालणार असल्याचं बोललं जात आहे.

दहशतवादाचा मुद्दा

गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता अमित शहा दहशतवादाच्या मुद्यावर काम करणार आहेत. देशात आणि जम्मू – काश्मीरमध्ये सध्या दहशतवादाचा मुद्दा गाजत आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी वाढत आहे. त्यामुळे दहशतवादाचा मुद्दा सोडवण्यासाठी अमित शहा प्राधान्य देतील. गुजरातचे गृहमंत्री असताना अमित शहा यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीला रोखण्यात यश मिळवलं होतं.

शेजारी देशांशी संबंध सुधारण्यावर भर

अमित शहा हे शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारण्यावर भर देतील. केवळ पाकिस्तान नाही तर चीन आणि नेपाळशी देखील संबंध सुधारण्यावर त्यांचा भर असेल. शिवाय, म्यानमार आणि बांग्लादेशमधून होणाऱ्या घुसखोरीविरोधात देखील अमित शहा कठोर कारवाई करू शकतात.

मोदींचं मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, रणनीतीचं 'हे' आहे कनेक्शन

नक्षलवादाला आळा

छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेशमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांना कारवाई केली होती. पदभार स्वीकारताच अमित शहा या मुद्याला प्राधान्यानं हात घालतील.

घरगुती हिंसाचाराविरोधात कठोर कायदा

गुजरातचे गृहमंत्री असताना राज्याच्या क्राईम रेटमध्ये घट झाली होती. त्याचप्रकारची कारवाई अमित शहा यावेळी देखील करू शकतात.

पंतप्रधानांच्या शपथविधीला ममता बॅनर्जी गैरहजर; भाजपची पोस्टरबाजी

जम्मू – काश्मीरची हालत सुधारण्यावर भर

जम्मू – काश्मीरमध्ये सध्या दगडफेकीच्या घटना देखील वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी अमित शहा प्राधान्य देतील.

रोहिंग्यांना लगाम

रोहिंग्याची घुसखोरी देखील वाढली आहे. या मुद्याला देखील अमित शहा प्राधान्यानं सोडवण्याचा प्रयत्न करतील.

पश्चिम बंगालमधील हिंसाचार

लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार वाढला होता. शिवाय, स्थानिक निवडणुकांमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढल्या होत्या. पण, गृहमंत्रीपदाची जबाबदारी घेताच अमित शहा या मुद्याकडे देखील लक्ष देतील.

VIDEO: कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी धनंजय मुंडेंनी म्हटली 'कविता'

First published: June 1, 2019, 1:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading