25 जून : उत्तराखंडमध्ये महाप्रलयानंतर राजकारणाला सुरूवात झाली. मोदींच्या भेटीमुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैर्या झडत असताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज गुप्तकाशीच्या दौर्यावर आहेत. तिथं त्यांनी मदत छावणीला भेट दिली, तसंच चार धाम विमानतळावर त्यांनी पायलट आणि बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. मात्र, त्यांनी यावेळी सीएनएन आयबीएननं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं. उत्तराखंडमधल्या प्रलयानंतर तब्बल आठ दिवसांनी राहुल यांनी तिथं भेट दिल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. त्यानंतर सोमवारी ते डेहराडूनला गेले आणि हवाई पाहणी केली. दरम्यान, प्रलयग्रस्त उत्तराखंडला व्हिआयपींनी भेटी देऊ नयेत या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचनेकडे या दौर्यादरम्यान दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा