S M L

'संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजूट'

Sachin Salve | Updated On: Jun 25, 2013 05:08 PM IST

'संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजूट'

pm on terror attack25जून :दहशतवाद्यांना कधीच त्यांच्या कामात यश मिळणार नाही, त्यांच्याविरोधातील लढाईत आज संपूर्ण भारत देश एकजूट आहे असं प्रतिपादन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलंय. आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी काश्मीर दौर्‍यावर आहेत. इथं झालेल्या एका सभेत ते बोलत होते.

सोमवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला यानंतर आपला दौरा रद्द न करत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी आज श्रीनगरमध्ये दाखल झाले. रातले वीज प्रकल्पाचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान आणि सोनिया गांधी किश्तवारला भेट दिली. यावेळी झालेल्या सभेत पंतप्रधानांनी दहशतवाद्यांविरोधी कारवाईत प्राणाची बाजी लावणार्‍या शहीद जवानांना श्रद्धाजंली वाहिली. आज संपूर्ण देश दहशतवाद्यांच्या विरोधात एकजूट उभा राहिला आहे. त्यांना त्यांच्या कामात कधीच यश येणार नाही. विकासासाठी सुरक्षा असणे आवश्यक आहे. या भागात दहशतवाद्यांचे हल्ले हे शांती,सलोखा निर्माण करण्यास अडथळा आणू शकत नाही असं पंतप्रधानांनी म्हटलंय. तसंच 2012 सालात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद गेल्या दोन दशकांच्या तुलनेत घट झालीय असंही पंतप्रधानांनी म्हटलंय. तर आयएएस आणि आयपीएस सारख्या लोकसेवांमध्ये काश्मिरी तरूणांची संख्या वाढल्याचा आनंद आहे असं सोनिया गांधी म्हणाल्या.

पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या निषेधार्थ बंददरम्यान, पंतप्रधानांच्या काश्मीर भेटीच्या निषेधार्थ हुर्रियत कॉन्फरन्सनं काश्मीर खोर्‍यात बंदचं आवाहन केलंय. तसंच सोमवाकी हिजबूल मुजाहिद्दीननं लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता, त्यात 8 जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर श्रीनगर आणि किश्तवार या शहरांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र, त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2013 01:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close