S M L

उत्तराखंडमध्ये पावसातही बचावकार्य सुरू

Sachin Salve | Updated On: Jun 25, 2013 09:14 PM IST

utrakhand floods 24 june25 जून : उत्तराखंडमध्ये सगळीकडे पाऊस पडत असूनही बचावकार्य सुरू आहे. अजून 9000 लोकांना वाचवण्याचं आव्हान लष्कर आणि आयटीबीपीसमोर आहे. हवामान सध्या स्वच्छ झाल्यामुळे सर्व तळांवरून हवाई मार्गानं बचावकार्य सुरू ठेवण्यात आलंय.

मात्र, उत्तरकाशी आणि चामोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं पुन्हा हवाई मार्गाने मदतकार्यात अडथळे येतील अशी भीती आहे. बद्रीनाथ आणि हर्शीलमध्ये मात्र जोमात मदतकार्य सुरू आहे.

सध्या बद्रीनाथमध्ये सर्वाधिक लोक अडकलेले आहेत. केदारनाथच्या मार्गावर असलेल्या गुप्तकाशीमध्ये मदतकार्य संपत आलंय. पुढचे 72 तास हवामान स्वच्छ राहिल्यास, मदतकार्य पूर्ण होईल असं उत्तराखंड सरकारनं कृती अहवालात म्हटलंय. बद्रीनाथ, जोशीमठ, गौचर, उत्तरकाशी आणि इतर ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत झालाय.


उत्तराखंडमध्ये मदकार्य

- उत्तराखंड सरकारने 12 वरिष्ठ ऑफिसर्सची मदतकार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केली नियुक्ती

- आत्तापर्यंत 97000 यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी नेण्यात यश

Loading...

- त्यापैकी 11000 लोकांची हेलिकॉप्टरद्वारे केली सुटका

- 48 हेलिकॉप्टर मदतकार्यात कार्यरत

- लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी 4500 वाहने कार्यरत

- सुटका झालेल्या प्रत्येक व्यक्तीला उत्तराखंड सरकारतर्फे 2000 रूपयांची मदत

- राहत्या ठिकाणी जाण्यासाठी उत्तराखंड सरकारतर्फे सुटलेल्या प्रत्येक व्यक्तीला ट्रेन किंवा बसचे मोफत तिकीट.

-प्रत्येक ट्रेनमध्ये सुटलेल्या लोकांसाठी स्पेशल बोगीची सुविधा

-उत्तराखंडातील गेस्ट हाऊस आणि टूरिस्ट हॉटेल्समध्ये मोफत सोय

-राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात आणि महत्वाच्या शहरात रिलीफ कँपची व्यवस्था

- त्यामध्ये जेवण, औषधं आणि सेवासुविधांची व्यवस्था

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2013 03:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close