महाप्रलयात मृतांचा आकडा 1,000 वर

महाप्रलयात मृतांचा आकडा 1,000 वर

  • Share this:

uttarakhand floods22322 जून : उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाला आज आठवडा पूर्ण झाला. उत्तराखंडच्या महाप्रलयातल्या मृतांचा अधिकृत आकडा एक हजारावर गेला आहे. आत्तापर्यंत 75 हजार लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. सध्या गौरीकुंड परिसरात असलेल्या घनदाट जंगलातून भाविकांना बाहेर काढणं हे लष्कराच्या दृष्टीनं मोठी कठीण मोहीम आहे.

याठिकाणी अडकलेल्या एक हजार लोकांपैकी 470 लोकांना आत्तापर्यंत सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. आयबीएन नेटवर्कची टीम आज बद्रीनाथमध्ये पोहचलीय. सोनप्रयाग इथं अडकलेल्या शेकडो लोकांना बाहेर काढण्यासाठी नदीवर लष्कारानं पूल बांधलाय. येत्या 48 तासात उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळं याठिकाणचं बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

संबंधित बातम्या

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2013 09:02 PM IST

ताज्या बातम्या