S M L

गरिबी निर्मूलनात गुजरात सर्वात पिछाडीवर

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2013 10:24 PM IST

गरिबी निर्मूलनात गुजरात सर्वात पिछाडीवर

नवी दिल्ली 18 जून : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गुजरातच्या विकासाचा गवगवा करत असले तरी नियोजन आयोगाच्या रिपोर्टमध्ये या विकासावर ताशेरे ओढण्यात आले आहे. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात गुजरातनं चांगली कामगिरी केली असली तरी आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये फारशी सुधारणा नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

अनुसूचित जमाती म्हणजेच ST आणि मुस्लिमांमध्ये गरिबी निर्मूलन करण्यात गुजरात सर्वात पिछाडीवर आहे.पण, गुजरात हे देशातल्या प्रगतीशील राज्यांपैकी एक असल्याचं म्हणत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेक सिंह अहलुवालिया यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुकही केलं.

गुजरातचा या वर्षीचा आर्थिक आराखडा केंद्रीय नियोजन आयोगाकडून मंजूर करून घेण्यासाठी मोदींनी आज दिल्लीत अहलुवालिया यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी गुजरातसाठी 59 हजार कोटींचा प्लॅन मंजूर करून घेतला. यापैकी 42 टक्के निधी सामाजिक विकासासाठी वापरणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.गुजरातच्या आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांबाबत नियोजन आयोगाच्या अहवालात काय म्हटलंय ?

- लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्यात गुजरातपेक्षा तुलनेनं गरीब असलेल्या ओरिसाची कामगिरी चांगली आहे

Loading...

- ओरिसामध्ये 20 टक्के दारिद्र्य निर्मूलन झालंय. तर गुजरातमध्ये फक्त 8 पूर्णांक 6 टक्के दारिद्र्य निर्मूलन झालंय

- अनुसूचित जमाती म्हणजेच ST आणि मुस्लिमांमध्ये गरिबी निर्मूलन करण्यात गुजरात सर्वात पिछाडीवर आहे

- 2004 ते 2013 या काळातलं गुजरात राज्याचं सकल वार्षिक उत्पादन हे उत्तराखंडपेक्षा कमी आहे.

- यावरून गुजरातमधला विकास आहे असंतुलित असल्याचा निष्कर्ष नियोजन आयोगाच्या अहवालात काढण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2013 06:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close