S M L

नरेंद्र मोदींनी घेतली अडवणींची भेट

Sachin Salve | Updated On: Jun 18, 2013 11:20 PM IST

नरेंद्र मोदींनी घेतली अडवणींची भेट

modi and advaniनवी दिल्ली 18 जून : भाजपच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच दिल्लीत आले होते. हा दिवस त्यांनी पक्षांतर्गत कामांसाठीही वापरला. मोदी प्रचार समितीचे प्रमुख झाल्यानंतर राजीनामा देणार्‍या लालकृष्ण अडवाणींना ते भेटले. जवळपास 1 तास त्यांची चर्चा झाली.

 

ही भेट खेळीमेळीच्या वातावरणात झाली असं दोन्ही नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून सांगण्यात आलं. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचीही भेट घेतली. त्याआधी, सकाळी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. 

लालकृष्ण अडवाणी यांनी लिहीलेल्या पत्रामुळे पक्षाची फार मोठी हानी झालीय, त्यामुळे अडवाणी यांनी आता खुलासाही करायला हवा, असं मोदी यांनी जोशी यांना सागितल्याचं कळतंय. दरम्यान, मोदी यांनी आज भाजपाच्या नव्या सरचिटणीसांचीही बैठक घेतली आणि येत्या निवडणुकाबद्दल चर्चा केली.

 

Loading...
Loading...

मागील आठवड्यात गोव्यात नरेंद्र मोदींची 2014च्या निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारप्रमुखपदी निवड झाल्यामुळे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. अडवाणींनी सर्वपदांचा राजीनामा दिल्यामुळे भाजपला एकच हादरा बसला होता.

 

त्यावेळी भाजपच्या सर्व नेत्यांनी अडवाणींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मोदींनी गुजरातमधूनच समजदारीचा सल्ला दिला. अखेर अडवाणींच्या नाराजीनाट्यावर दोन दिवसांनंतर पडदा पडला. अडवाणींनी आपले राजीनामे मागे घेतले. गेल्या आठवड्यात भाजपसाठी दिल्लीतील तणावपूर्ण वातावरण निवळण्यानंतर आज मोदींनी दिल्लीत एंट्री केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2013 01:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close