उत्तराखंडमध्ये पावसाचं थैमान, 30 जणांचा बळी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2013 10:13 PM IST

उत्तराखंडमध्ये पावसाचं थैमान, 30 जणांचा बळी

utrakhandउत्तराखंड 17 जून : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलंय. शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झालाय. तर 100 हून अधिक जण बेपत्ता आहेत. पावसामुळे चार धाम यात्रा स्थगित करण्यात आलीय.

त्यामुळे केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, आणि यमुनोत्रीमध्ये 57 हजार भाविक अडकून पडले आहेत. उत्तराखंडमध्ये जूनमध्ये झालेल्या या पावसाने गेल्या 88 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय.

राज्यातल्या अलकनंदा, मंदाकिनी, भागीरथी सारख्या मोठ्या नद्यांसह जवळपास सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. उत्तरकाशी आणि रुद्रप्रयाग या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी झाल्यानं इथं पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. घरं, गाड्या सगळा संसारच वाहून गेल्यानं लोकं हवालदील झालेत. पिकाचंही मोठं नुकसान झालंय. हरिद्वारमध्ये गंगेलाही पुराचा धोका आहे. त्यामुळे किनार्‍यावरच्या शेकडों गावांना हायअलर्ट जारी करण्यात आलाय. पुढचे पाच दिवस असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. नॅशनल डिजास्टर रेस्क्यू फोर्सच्या 12 टीम्स बचावकार्य करत आहेत. पण, संततधार पावसामुळे बचाकार्यात अडथळे येत आहेत.

मोबाईल,फोन बंद

गंगा नदीने धोक्याची पातळी ओंलाडलीयं.त्यामुळे उत्तराखंडच्या अनेक भागात मोबाईलचे टॉवर कोसळून संदेशवहन यंत्रणा कोलमडली आहे. पाण्याच्या वाढलेल्या पातळीमुळे अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत.

Loading...

100 यात्रेकरूंची सुटका

लष्करानं उत्तराखंडात पूरग्रस्त भागात नागरी प्रशासन आणि स्वयंसेवकाच्या सहाय्यानं मदतकार्य सुरू केलंय. गोविंदघाट आणि जोशीमठ दरम्यान, असलेल्या 100 यात्रेकरूंची सुटका करण्यात आलीयं. तर शिमला बायपासमधून 22 लोकांची सुटका करण्यात आलीयं. दरड कोसळल्यामुळे हजारो पर्यटक आणि यात्रेकरू अडकून पडले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2013 03:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...