'भारत बंद'चा भडका, देशभरात 10 जणांचा मृत्यू

'भारत बंद'चा भडका, देशभरात 10 जणांचा मृत्यू

केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केलीये. या याचिकेवर 20 मार्चच्या निर्णयाची समिक्षा होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 एप्रिल : अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला सोमवारी वेगवेगळ्या राज्यात हिंसक वळण लागलं. या बंदमध्ये देशभरात विविध ठिकाणी 10 जणांचा मृत्यू झालाय.

सोमवारी दलित संघटनांनी भारत पुकारला होता. गुजरात, पंजाब, राजस्थान, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि ओडिसामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. अनेक ठिकाणी दगडफेक आणि वाहनं जाळपोळीच्या घटना घडल्यात.

तर मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानं प्रकरण चांगलच चिघळलं.  ग्वाव्हेरमध्ये दोघांचा तर मुरैनात एकाचा मृत्यू झालाय. आतापर्यंत मध्यप्रदेशमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, आंदोलकांना शांत करण्यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केलीये. या याचिकेवर 20 मार्चच्या निर्णयाची समिक्षा होणार आहे.

First published: April 3, 2018, 9:09 AM IST

ताज्या बातम्या