Elec-widget

मय्यप्पन-बुकींच्या 'सेटिंग'चा ICC ने दिला होता अलर्ट

मय्यप्पन-बुकींच्या 'सेटिंग'चा ICC ने दिला होता अलर्ट

नवी दिल्ली 31 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. आयसीसीने बीसीसीआयला चेन्नई सुपर किंग्जचा सीईओ गुरूनाथ मय्यप्पन आयपीएलचा सहावा हंगाम सुरु झाल्यानंतर लगेच आयसीसीने बीसीसीआयला सतर्क केलं होतं. मात्र बीसीसीआयनं या इशार्‍याकडे दुर्लक्ष केलं होतं. अभिनेता विंदू आणि मय्यप्पन यांच्या संवादाची माहिती आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेला गुरूनाथ मय्यप्पनने विंदूला आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. तसंच मय्यप्पननेच आयसीसीनं आपल्याबद्दल बीसीसीआयला सतर्क केलं होतं असं विंदूला सांगितलंय. मय्यप्पननं विंदूला इतर टीममधील खेळाडूंबद्दलही माहिती दिली होती. मय्यप्पननं विंदूला ठराविक ओव्हर दरम्यान होणार्‍या रन्सचीही बेटिंगसाठी माहिती दिली होती. दरम्यान, श्रीनिवासन यांनी मात्र आयसीसीकडून आपल्याला अशी कोणतीही माहिती मिळाली नव्हती, असं स्पष्ट केलंय. हिमाचल प्रदेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी मात्र आयसीसीच्या अशा कोणत्याही प्रकारच्या अलर्टची आपल्याला माहिती नसल्याचे सांगितलंय. तर माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी बीसीसीआयने लोकांची फसवणूक केली अशी टीका केली. बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आझाद यांनी केली.

  • Share this:

नवी दिल्ली 31 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. आयसीसीने बीसीसीआयला चेन्नई सुपर किंग्जचा सीईओ गुरूनाथ मय्यप्पन आयपीएलचा सहावा हंगाम सुरु झाल्यानंतर लगेच आयसीसीने बीसीसीआयला सतर्क केलं होतं. मात्र बीसीसीआयनं या इशार्‍याकडे दुर्लक्ष केलं होतं. अभिनेता विंदू आणि मय्यप्पन यांच्या संवादाची माहिती आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटकेत असलेला गुरूनाथ मय्यप्पनने विंदूला आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. तसंच मय्यप्पननेच आयसीसीनं आपल्याबद्दल बीसीसीआयला सतर्क केलं होतं असं विंदूला सांगितलंय. मय्यप्पननं विंदूला इतर टीममधील खेळाडूंबद्दलही माहिती दिली होती. मय्यप्पननं विंदूला ठराविक ओव्हर दरम्यान होणार्‍या रन्सचीही बेटिंगसाठी माहिती दिली होती. दरम्यान, श्रीनिवासन यांनी मात्र आयसीसीकडून आपल्याला अशी कोणतीही माहिती मिळाली नव्हती, असं स्पष्ट केलंय. हिमाचल प्रदेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी मात्र आयसीसीच्या अशा कोणत्याही प्रकारच्या अलर्टची आपल्याला माहिती नसल्याचे सांगितलंय. तर माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी बीसीसीआयने लोकांची फसवणूक केली अशी टीका केली. बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आझाद यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2013 02:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...