यवतमाळ पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत चुरस

यवतमाळ पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत चुरस

आशिष जाधवसह भास्कर मेहरे, यवतमाळयवतमाळ 27 मे : इथं विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 2 जूनला मतदान होतंय. एकीकडे काँग्रेसमधील पक्षांर्गत वाद आणि दुसरीकडे स्थानिक राष्ट्रवादीची कुरघोडी यामुळे ही पोटनिवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची बनली आहे. विदर्भातली यवतमाळची पोटनिवडणूक चुरशीची होणार आहे. कारण काँग्रेसचा एक गट आणि राष्ट्रवादी दगाफटका करण्याची शक्यता आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू असलेल्या निलेश पारवेकर अटीतटीच्या निवडणुकीत इथून निवडून आले. पण पारवेकरांच्या अपघाती निधनानंतर.. पोटनिवडणुकीसाठी आपला मुलाला तिकीट मिळावं यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे खूप प्रयत्न केले. पण पारवेकरांना असलेली साहनुभूती आणि त्यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर यांची कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी पाहता काँग्रेस श्रेष्ठींनी नंदिनी पारवेकरांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे माणिकराव ठाकरेंचे हितसंबंध आडवे येतायत. खरंतर यवतमाळ शहरासह मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढतेय. त्यामुळे आधीच जिल्हा परिषद हाती असलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेस बरोबर असहकाराची भूमिका घेतली होती. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यशी चर्चा करून स्थानिक राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवलाय.नंदिनी पारवेकर यांच्यासाठी स्थानिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दिलजमाई झाली असली तरी भाजपाने दोनदा आमदार राहिलेल्या मदन येरावार यांना पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उभं केलंय.ही निवडणूक माणिकराव ठाकरे यांच्यासाठी फार अडचणीची झालीय. नंदिनी पारवेकर निवडून आल्या तर 2014 च्या निवडणुकीतही त्यांनाच उमेदवारी दिली जाईल हे स्पष्ट आहे. त्यामुळे माणिकराव ठाकरे पुत्रप्रेम बघतील की पक्षनिष्ठा जपतील याकडे सर्वांच लक्ष लागलंय.

  • Share this:

आशिष जाधवसह भास्कर मेहरे, यवतमाळ

यवतमाळ 27 मे : इथं विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 2 जूनला मतदान होतंय. एकीकडे काँग्रेसमधील पक्षांर्गत वाद आणि दुसरीकडे स्थानिक राष्ट्रवादीची कुरघोडी यामुळे ही पोटनिवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

विदर्भातली यवतमाळची पोटनिवडणूक चुरशीची होणार आहे. कारण काँग्रेसचा एक गट आणि राष्ट्रवादी दगाफटका करण्याची शक्यता आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू असलेल्या निलेश पारवेकर अटीतटीच्या निवडणुकीत इथून निवडून आले. पण पारवेकरांच्या अपघाती निधनानंतर.. पोटनिवडणुकीसाठी आपला मुलाला तिकीट मिळावं यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे खूप प्रयत्न केले. पण पारवेकरांना असलेली साहनुभूती आणि त्यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर यांची कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी पाहता काँग्रेस श्रेष्ठींनी नंदिनी पारवेकरांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे माणिकराव ठाकरेंचे हितसंबंध आडवे येतायत.

खरंतर यवतमाळ शहरासह मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढतेय. त्यामुळे आधीच जिल्हा परिषद हाती असलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेस बरोबर असहकाराची भूमिका घेतली होती. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यशी चर्चा करून स्थानिक राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवलाय.

नंदिनी पारवेकर यांच्यासाठी स्थानिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दिलजमाई झाली असली तरी भाजपाने दोनदा आमदार राहिलेल्या मदन येरावार यांना पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उभं केलंय.

ही निवडणूक माणिकराव ठाकरे यांच्यासाठी फार अडचणीची झालीय. नंदिनी पारवेकर निवडून आल्या तर 2014 च्या निवडणुकीतही त्यांनाच उमेदवारी दिली जाईल हे स्पष्ट आहे. त्यामुळे माणिकराव ठाकरे पुत्रप्रेम बघतील की पक्षनिष्ठा जपतील याकडे सर्वांच लक्ष लागलंय.

First published: May 27, 2013, 3:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या