मुंबई रणजीच्या फायनलमध्ये

7 जानेवारी मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात रणजी ट्रॉफीची फायनल होणार आहे. चेन्नईत सौराष्ट्रविरूद्ध पहिल्या इनिंगमध्ये घेतलेल्या आघाडीच्या जोरावर मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 5 विकेटवर 247 रन्सच्या स्कोअरवर सौराष्ट्रने आपली इनिंग पुढे सुरु केली. पण धवल कुलकर्णीने शाह आणि जोगीयनला झटपट आऊट केलं. सौराष्ट्राची अवस्था तेव्हा 7 विकेटवर 256 रन्स अशी झाली होती. पण त्यानंतर मकवाना आणि ध्रुव यांनी सेंच्युरी पार्टनरशिप करुन सौराष्ट्राची इनिंग सावरली. ध्रुव 44 रन्स करुन आऊट झाला आणि त्यांची उरलेली टीम झटपट पॅव्हेलियनमध्ये परतली. धवल कुलकर्णी आणि रमेश पोवार यांनी प्रत्येकी 5 विकेट घेतल्या.नागपूरमध्ये सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीच्या दुस-या सेमीफायनलमध्ये उत्तरप्रदेशनं बाजी मारली. शिवकांत शुक्ला आणि परविंदर सिंग यांनी केलेल्या दमदार सेंच्युरीच्या जोरावर उत्तरप्रदेशनं फायनलमध्ये प्रवेश केला. तामिळनाडूनं पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या 445 रन्सला उत्तर प्रदेशनं 8 विकेट गमावत 447 असं चोख उत्तर दिलं. रणजी ट्रॉफीची फायनल येत्या 12 तारखेला हैदराबादमध्ये रंगणार आहे.रणजी ट्रॉफी स्पर्धेत तब्बल 37 वेळा विजेतेपद पटकावणारी मुंबईची टीम पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्यासाठी आता सज्ज झाली आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jan 7, 2009 05:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2009 05:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...