बजेट अधिवेशनाची वादळी सुरूवात

बजेट अधिवेशनाची वादळी सुरूवात

21 एप्रिलनवी दिल्ली : संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. पण, सुरवात होताच दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करावं लागलं. दिल्ली बलात्कार प्रकरणावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलीय. बलात्कार प्रकरणी विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर जेपीसीचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी जेपीसीच्या अध्यक्षांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता आहे. दिल्ली बलात्कार प्रकरण, जेपीसी अहवाल, 2 जी आणि कोळसा घोटाळा असे मुद्दे विरोधकांच्या हाती आहेत. पंतप्रधानांनी विनंती करुनही विरोधकांच्या गोंधळामुळे दोन वाजेपर्यंत लोकसभेच्या कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. दरम्यान, 2 जी घोटाळ्याबाबत आपण आज जेपीसीकडे अहवाल पाठवणार असल्याचं माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी सांगितलंय. स्पेक्ट्रम वाटपाबद्दल पंतप्रधानांना कल्पना होती, असं या उत्तरात म्हटल्याचं राजा यांनी सांगितलंय. या अधिवेशनात ही विधेयकं प्रतीक्षेत- पेन्शन अँड इन्शुरन्स रेग्युलेटरी बिल- अन्न सुरक्षा विधेयक- भूसंपादन विधेयक- लोकपाल विधेयक- कंपनी नियंत्रण विधेयकसंसदेच्या कामकाजावर किती खर्च होतो ?- एका मिनिटाला - 36 हजार रु.- एका तासाला - 21 लाख रु.- एका दिवसाला - 1.7 कोटी रु. कामकाज झालं नाही तर करदात्यांचा एवढा पैसा वाया जातो

  • Share this:

21 एप्रिल

नवी दिल्ली : संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली. पण, सुरवात होताच दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करावं लागलं. दिल्ली बलात्कार प्रकरणावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतलीय. बलात्कार प्रकरणी विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर जेपीसीचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी जेपीसीच्या अध्यक्षांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता आहे. दिल्ली बलात्कार प्रकरण, जेपीसी अहवाल, 2 जी आणि कोळसा घोटाळा असे मुद्दे विरोधकांच्या हाती आहेत. पंतप्रधानांनी विनंती करुनही विरोधकांच्या गोंधळामुळे दोन वाजेपर्यंत लोकसभेच्या कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. दरम्यान, 2 जी घोटाळ्याबाबत आपण आज जेपीसीकडे अहवाल पाठवणार असल्याचं माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी सांगितलंय. स्पेक्ट्रम वाटपाबद्दल पंतप्रधानांना कल्पना होती, असं या उत्तरात म्हटल्याचं राजा यांनी सांगितलंय.

या अधिवेशनात ही विधेयकं प्रतीक्षेत

- पेन्शन अँड इन्शुरन्स रेग्युलेटरी बिल- अन्न सुरक्षा विधेयक- भूसंपादन विधेयक- लोकपाल विधेयक- कंपनी नियंत्रण विधेयक

संसदेच्या कामकाजावर किती खर्च होतो ?

- एका मिनिटाला - 36 हजार रु.- एका तासाला - 21 लाख रु.- एका दिवसाला - 1.7 कोटी रु. कामकाज झालं नाही तर करदात्यांचा एवढा पैसा वाया जातो

First published: April 22, 2013, 9:23 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading