आणखी एका 'निर्भया'साठी 'पब्लिक'रस्त्यावर

20 एप्रिलनवी दिल्ली : सामुहिक बलात्काराच्या घटनेतून सावरलेली दिल्ली शुक्रवारी पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरली. एक पाच वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार झाल्यानंतर आज दिल्लीत निदर्शनं सुरू झाली आहेत. पोलीस मुख्यालय आणि एम्स हॉस्पिटलबाहेर दिल्लीकरांनी निदर्शनं केली. हॉस्पिटल बाहेर निदर्शक मोठ्या संख्येनं जमले आहेत. मागील प्रकरणातून धडा घेत दिल्ली पोलिसांनी संपूर्ण दिल्लीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राष्ट्रपती भवनाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला. आंदोलकांनी संध्याकाळी कँडल मार्च काढला. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पीडित मुलीची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. मुलीची तब्येत आता स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. ती उपचारांना प्रतिसाद देतेय आणि आई वडिलांशीही तिनं बातचीत केली अशी माहिती संध्याकाळी एम्सच्या डॉक्टर्सनी दिली. उद्या तिच्यावर ऑपरेशन होणार असल्याचंही डॉक्टर्सनी सांगितलं. जमावबंदी लागू दरम्यान, दिल्ली पोलीस मुख्यालय, एम्स हॉस्पिटल, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या घराबाहेर दिवसभरात जोरदार निदर्शनं झाली. परिस्थिती लक्षात घेता सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संपूर्ण दिल्लीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. इंडिया गेटवर 144 कलम लागू करण्यात आलंय. मुख्य आरोपी अटकेतया प्रकरणातल्या मुख्य आरोपीला बिहारच्या मुझफ्फरपूरमधून अटक करण्यात आली आहे. दिल्लीतल्या डीसीपी ऑफिसमध्ये आरोपीची पोलिसांनी कसून चौकशी केली. या बलात्काराच्या घटनेविरोधात सगळीकडून तीव्र संताप व्यक्त होतोय. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी बलात्कार करणार्‍यांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली. दिल्लीत डिसेंबर महिन्यात झालेल्या सामूहिक बलात्काराला 4 महिने होत नाहीत, तोच अशाच एका निर्घ्रुण घटनेनं दिल्ली पुन्हा एकदा हादरली. पाच दिवसांपूर्वी घरासोमर खेळताना हरवलेली अवघ्या पाच वर्षांची चिमुकली जेव्हा सापडली तेव्हा अंगाचा धरकाप उडवणारी तिची अवस्था होती. तिच्यावर बलात्कार झाला होता, बेदम मारहाण झाली होती. इतकंच नाही तर तिच्या गुप्तांगावरही अतिशय विकृत जखमा होत्या. जितकी विकृत ही घटना आहे तेवढेच असंवेदनशील आहेत दिल्ली पोलीस... पोलिसांनी आधी तर मुलीच्या बेपत्ता होण्याचा एफआयआर (FIR)च दाखल करून घेतला नाही. आणि मुलगी सापडल्यावर प्रकरण मिटवण्याची भाषा केली, असा आरोप मुलीचे कुटुंबीय करत आहेत. या प्रकरणाची सर्वत्र ओरड झाल्यानंतर आणि आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी दोन फरार आरोपींना अटक केली. हे दोघंही त्या मुलीचे शेजारी आहेत. त्यांच्यावर अपहरण, बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र आपलीच पाठ थोपटून घेताहेत. दुसरीकडे दयानंद हॉस्पिटलबाहेर वेगळंच नाट्य रंगलं. मुलीला बघायला आलेले खासदार संदीप दीक्षित आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री ए. के. वालिया यांना आम आदमी पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी भांडावून सोडलं. त्यावेळी एका एसीपीनं आंदोलनकर्त्या मुलीच्या गालावर थप्पड लगावल्यानं प्रकरण आणखी चिघळलं. दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपांचं खंडन केलंय. आज या प्रकरणी बिहारमधून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 10, 2013 01:35 PM IST

आणखी एका 'निर्भया'साठी 'पब्लिक'रस्त्यावर

20 एप्रिल

नवी दिल्ली : सामुहिक बलात्काराच्या घटनेतून सावरलेली दिल्ली शुक्रवारी पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरली. एक पाच वर्षांच्या मुलीवर पाशवी बलात्कार झाल्यानंतर आज दिल्लीत निदर्शनं सुरू झाली आहेत. पोलीस मुख्यालय आणि एम्स हॉस्पिटलबाहेर दिल्लीकरांनी निदर्शनं केली. हॉस्पिटल बाहेर निदर्शक मोठ्या संख्येनं जमले आहेत. मागील प्रकरणातून धडा घेत दिल्ली पोलिसांनी संपूर्ण दिल्लीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. राष्ट्रपती भवनाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला. आंदोलकांनी संध्याकाळी कँडल मार्च काढला. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पीडित मुलीची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. मुलीची तब्येत आता स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. ती उपचारांना प्रतिसाद देतेय आणि आई वडिलांशीही तिनं बातचीत केली अशी माहिती संध्याकाळी एम्सच्या डॉक्टर्सनी दिली. उद्या तिच्यावर ऑपरेशन होणार असल्याचंही डॉक्टर्सनी सांगितलं.

जमावबंदी लागू

दरम्यान, दिल्ली पोलीस मुख्यालय, एम्स हॉस्पिटल, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या घराबाहेर दिवसभरात जोरदार निदर्शनं झाली. परिस्थिती लक्षात घेता सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संपूर्ण दिल्लीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. इंडिया गेटवर 144 कलम लागू करण्यात आलंय.

मुख्य आरोपी अटकेत

या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला बिहारच्या मुझफ्फरपूरमधून अटक करण्यात आली आहे. दिल्लीतल्या डीसीपी ऑफिसमध्ये आरोपीची पोलिसांनी कसून चौकशी केली. या बलात्काराच्या घटनेविरोधात सगळीकडून तीव्र संताप व्यक्त होतोय. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी बलात्कार करणार्‍यांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली.

दिल्लीत डिसेंबर महिन्यात झालेल्या सामूहिक बलात्काराला 4 महिने होत नाहीत, तोच अशाच एका निर्घ्रुण घटनेनं दिल्ली पुन्हा एकदा हादरली. पाच दिवसांपूर्वी घरासोमर खेळताना हरवलेली अवघ्या पाच वर्षांची चिमुकली जेव्हा सापडली तेव्हा अंगाचा धरकाप उडवणारी तिची अवस्था होती. तिच्यावर बलात्कार झाला होता, बेदम मारहाण झाली होती. इतकंच नाही तर तिच्या गुप्तांगावरही अतिशय विकृत जखमा होत्या. जितकी विकृत ही घटना आहे तेवढेच असंवेदनशील आहेत दिल्ली पोलीस... पोलिसांनी आधी तर मुलीच्या बेपत्ता होण्याचा एफआयआर (FIR)च दाखल करून घेतला नाही. आणि मुलगी सापडल्यावर प्रकरण मिटवण्याची भाषा केली, असा आरोप मुलीचे कुटुंबीय करत आहेत. या प्रकरणाची सर्वत्र ओरड झाल्यानंतर आणि आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी दोन फरार आरोपींना अटक केली. हे दोघंही त्या मुलीचे शेजारी आहेत. त्यांच्यावर अपहरण, बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र आपलीच पाठ थोपटून घेताहेत.

दुसरीकडे दयानंद हॉस्पिटलबाहेर वेगळंच नाट्य रंगलं. मुलीला बघायला आलेले खासदार संदीप दीक्षित आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री ए. के. वालिया यांना आम आदमी पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी भांडावून सोडलं. त्यावेळी एका एसीपीनं आंदोलनकर्त्या मुलीच्या गालावर थप्पड लगावल्यानं प्रकरण आणखी चिघळलं. दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपांचं खंडन केलंय. आज या प्रकरणी बिहारमधून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2013 09:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...