दिल्लीत 5 वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी बलात्कार

दिल्लीत 5 वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी बलात्कार

19 एप्रिलनवी दिल्ली : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तरुणीवर पाशवी बलात्कार झाल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले. आंदोलनं झाली, बलात्कारविरोधी कायद्यासाठी जस्टिस वर्मा समितीची स्थापना करण्यात आली. समितीचा अहवाल आल्यानंतर तातडीनं बलात्कारविरोधी कायदा करण्यात आला. पण, एवढं सगळं होऊनही दिल्लीत पुन्हा एकदा निर्घ्रुण बलात्कार झाला. तो ही एका 5 वर्षांच्या मुलीवर...पाच वर्षांच्या या मुलीचं अपहरण करून तिला 2 दिवस डांबून ठेवण्यात आलं आणि तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. आणि यासंदर्भात तक्रार नोंदवायला गेलेल्या तिच्या पालकांना पोलिसांच्या अनास्थेचा अनुभव आला. ही चिमुकली आता एम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतेय. दिल्लीत डिसेंबर महिन्यात झालेल्या सामूहिक बलात्काराला 4 महिने होत नाहीत, तोच अशाच एका निर्घ्रुण घटनेनं दिल्ली पुन्हा एकदा हादरली. पाच दिवसांपूर्वी घरासोमर खेळताना हरवलेली अवघ्या पाच वर्षांची चिमुकली जेव्हा सापडली तेव्हा अंगाचा धरकाप उडवणारी तिची अवस्था होती. तिच्यावर बलात्कार झाला होता, बेदम मारहाण झाली होती. इतकंच नाही तर तिच्या गुप्तांगावरही अतिशय विकृत जखमा होत्या. जितकी विकृत ही घटना आहे तेवढेच असंवेदनशील आहेत दिल्ली पोलीस... पोलिसांनी आधी तर मुलीच्या बेपत्ता होण्याचा एफआयआर (FIR)च दाखल करून घेतला नाही. आणि मुलगी सापडल्यावर प्रकरण मिटवण्याची भाषा केली, असा आरोप मुलीचे कुटुंबीय करताहेत. या प्रकरणाची सर्वत्र ओरड झाल्यानंतर आणि आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी दोन फरार आरोपींना अटक केली. हे दोघंही त्या मुलीचे शेजारी आहेत. त्यांच्यावर अपहरण, बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र आपलीच पाठ थोपटून घेताहेत. दुसरीकडे दयानंद हॉस्पिटलबाहेर वेगळंच नाट्य रंगलं. मुलीला बघायला आलेले खासदार संदीप दीक्षित आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री ए. के. वालिया यांना आम आदमी पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी भांडावून सोडलं. त्यावेळी एका एसीपीनं आंदोलनकर्त्या मुलीच्या गालावर थप्पड लगावल्यानं प्रकरण आणखी चिघळलं. दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपांचं खंडन केलंय. पण एका 5 वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच घराजवळ तब्बल 4 दिवस अतिशय विकृतपणे बलात्कार होत राहिला आणि पोलिसांना पत्ताच लागला नाही, याचं उत्तर मात्र दिल्ली पोलिसांना द्यावं लागणार आहे.

  • Share this:

19 एप्रिल

नवी दिल्ली : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तरुणीवर पाशवी बलात्कार झाल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले. आंदोलनं झाली, बलात्कारविरोधी कायद्यासाठी जस्टिस वर्मा समितीची स्थापना करण्यात आली. समितीचा अहवाल आल्यानंतर तातडीनं बलात्कारविरोधी कायदा करण्यात आला. पण, एवढं सगळं होऊनही दिल्लीत पुन्हा एकदा निर्घ्रुण बलात्कार झाला. तो ही एका 5 वर्षांच्या मुलीवर...पाच वर्षांच्या या मुलीचं अपहरण करून तिला 2 दिवस डांबून ठेवण्यात आलं आणि तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. आणि यासंदर्भात तक्रार नोंदवायला गेलेल्या तिच्या पालकांना पोलिसांच्या अनास्थेचा अनुभव आला. ही चिमुकली आता एम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतेय.

दिल्लीत डिसेंबर महिन्यात झालेल्या सामूहिक बलात्काराला 4 महिने होत नाहीत, तोच अशाच एका निर्घ्रुण घटनेनं दिल्ली पुन्हा एकदा हादरली. पाच दिवसांपूर्वी घरासोमर खेळताना हरवलेली अवघ्या पाच वर्षांची चिमुकली जेव्हा सापडली तेव्हा अंगाचा धरकाप उडवणारी तिची अवस्था होती. तिच्यावर बलात्कार झाला होता, बेदम मारहाण झाली होती. इतकंच नाही तर तिच्या गुप्तांगावरही अतिशय विकृत जखमा होत्या.

जितकी विकृत ही घटना आहे तेवढेच असंवेदनशील आहेत दिल्ली पोलीस... पोलिसांनी आधी तर मुलीच्या बेपत्ता होण्याचा एफआयआर (FIR)च दाखल करून घेतला नाही. आणि मुलगी सापडल्यावर प्रकरण मिटवण्याची भाषा केली, असा आरोप मुलीचे कुटुंबीय करताहेत.

या प्रकरणाची सर्वत्र ओरड झाल्यानंतर आणि आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी दोन फरार आरोपींना अटक केली. हे दोघंही त्या मुलीचे शेजारी आहेत. त्यांच्यावर अपहरण, बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र आपलीच पाठ थोपटून घेताहेत.

दुसरीकडे दयानंद हॉस्पिटलबाहेर वेगळंच नाट्य रंगलं. मुलीला बघायला आलेले खासदार संदीप दीक्षित आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री ए. के. वालिया यांना आम आदमी पक्षाच्या आंदोलनकर्त्यांनी भांडावून सोडलं. त्यावेळी एका एसीपीनं आंदोलनकर्त्या मुलीच्या गालावर थप्पड लगावल्यानं प्रकरण आणखी चिघळलं.

दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपांचं खंडन केलंय. पण एका 5 वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच घराजवळ तब्बल 4 दिवस अतिशय विकृतपणे बलात्कार होत राहिला आणि पोलिसांना पत्ताच लागला नाही, याचं उत्तर मात्र दिल्ली पोलिसांना द्यावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2013 01:17 PM IST

ताज्या बातम्या