Elec-widget

बंगळुरूमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट, 16 जण जखमी

बंगळुरूमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर स्फोट, 16 जण जखमी

17 एप्रिलबंगळुर : निवडणुकीच्या तोंडावर बंगळुरू आज स्फोटानं हादरलं. या स्फोटात 16 जण जखमी झाले असून त्यामध्ये 8 पोलिसांचा समावेश आहे. बंगळुरूमध्ये मल्लेश्वरम या रहिवाशी भागात भाजपचं प्रदेश कार्यालय आहे. इथेच उभ्या असलेल्या एका बाईकवर सकाळी 10 वाजून 28 मिनिटांनी मोठा स्फोट झाला.स्फोट इतका जबरदस्त होता की, पाच गाड्यांची अक्षरश: राखरांगोळी झाली. आसपसाच्या घरांच्या सर्व काचा फुटल्या. स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. सुरुवातीला कारमधल्या सीएनजी कीटचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, टाईमरचा वापर करून IEDचा स्फोट करण्यात आला असं तपासात स्पष्ट झालं. हा दहशतवादी हल्ला असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानंही स्पष्ट केलंय. स्फोटानंतर पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली. फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आणि एनआयएची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परिसरातलं सीसीटीव्ही फुटेजही मागवण्यात आलंय. हा हल्ला म्हणजे भाजपला लक्ष्य करण्यात आल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. कर्नाटकात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक होतेय. त्यानिमित्ताने या पक्षकार्यालयात नेत्यांची कार्यकर्त्यांची वर्दळ असते. या हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे, हे मात्र अजून कळू शकलेलं नाही. बंगळुरू, मुंबई, हैदराबाद यासारखी मोठी आणि महत्त्वाची शहरं ही वारंवार अतिरेकी हल्ल्यांचं लक्ष्यं ठरताहेत. पाहूया बंगळुरूमध्ये यापूर्वी झालेले अतिरेकी हल्ले...- बंगळुरू सर्वात पहिल्यांदा अतिरेकी हल्ल्यानं हादरलं ते 28 डिसेंबर 2005ला... इथल्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सच्या परिसरात झालेल्या गोळीबारात 1 ठार तर चौघं जखमी झाले होते- या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने लष्कर-ए-तोयबाच्या 6 संशयितांना आजन्म कारवासाची शिक्षा सुनावली - यानंतर तीन वर्षांनी 25 जुलै 2008ला साखळी बॉम्बस्फोटांनी बंगळुरू हादरलं. यात दोघांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले होते - या हल्ल्यातल्या 6 आरोपींविरोधात 11 जून 2010 साली चार्जशीट दाखल करण्यात आलं. प्रकरण अजून प्रलंबित आहे - यानंतर 17 एप्रिल 2010 ला चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर बॉम्बस्फोट झाला. यात 15 जण जखमी झाले होते - या बॉम्बस्फोटातल्या 14 पैकी 7 आरोपींना अटक करण्यात आलीय. पण, हल्ल्याचा मुख्य संशयित यासीन भटकळ अजून फरार आहे भाजपला याचा फायदा होईल -शकील अहमददरम्यान, बंगळुरूमधल्या बॉम्बस्फोटावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये नवीनच वाद निर्माण झालाय. या बॉम्बस्फोटासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी वादग्रस्त ट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये अहमद म्हणतात, बंगळुरूमध्ये भाजपच्या कार्यालयाजवळ झालेला बॉम्बस्फोट हा जर अतिरेकी हल्ला असेल तर येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला त्याचा नक्की फायदा होईल असं म्हटलं आहे. शकील अहमद यांच्या या वादग्रस्त ट्वीटवरून भाजपनं काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यानंतर, अखेर शकील अहमद यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं स्पष्ट केलं. काँग्रेसलाही यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.

  • Share this:

17 एप्रिल

बंगळुर : निवडणुकीच्या तोंडावर बंगळुरू आज स्फोटानं हादरलं. या स्फोटात 16 जण जखमी झाले असून त्यामध्ये 8 पोलिसांचा समावेश आहे. बंगळुरूमध्ये मल्लेश्वरम या रहिवाशी भागात भाजपचं प्रदेश कार्यालय आहे. इथेच उभ्या असलेल्या एका बाईकवर सकाळी 10 वाजून 28 मिनिटांनी मोठा स्फोट झाला.

स्फोट इतका जबरदस्त होता की, पाच गाड्यांची अक्षरश: राखरांगोळी झाली. आसपसाच्या घरांच्या सर्व काचा फुटल्या. स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. सुरुवातीला कारमधल्या सीएनजी कीटचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, टाईमरचा वापर करून IEDचा स्फोट करण्यात आला असं तपासात स्पष्ट झालं. हा दहशतवादी हल्ला असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानंही स्पष्ट केलंय. स्फोटानंतर पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली. फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आणि एनआयएची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परिसरातलं सीसीटीव्ही फुटेजही मागवण्यात आलंय. हा हल्ला म्हणजे भाजपला लक्ष्य करण्यात आल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. कर्नाटकात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक होतेय. त्यानिमित्ताने या पक्षकार्यालयात नेत्यांची कार्यकर्त्यांची वर्दळ असते. या हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे, हे मात्र अजून कळू शकलेलं नाही.

बंगळुरू, मुंबई, हैदराबाद यासारखी मोठी आणि महत्त्वाची शहरं ही वारंवार अतिरेकी हल्ल्यांचं लक्ष्यं ठरताहेत. पाहूया बंगळुरूमध्ये यापूर्वी झालेले अतिरेकी हल्ले...

- बंगळुरू सर्वात पहिल्यांदा अतिरेकी हल्ल्यानं हादरलं ते 28 डिसेंबर 2005ला... इथल्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सच्या परिसरात झालेल्या गोळीबारात 1 ठार तर चौघं जखमी झाले होते- या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने लष्कर-ए-तोयबाच्या 6 संशयितांना आजन्म कारवासाची शिक्षा सुनावली - यानंतर तीन वर्षांनी 25 जुलै 2008ला साखळी बॉम्बस्फोटांनी बंगळुरू हादरलं. यात दोघांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले होते - या हल्ल्यातल्या 6 आरोपींविरोधात 11 जून 2010 साली चार्जशीट दाखल करण्यात आलं. प्रकरण अजून प्रलंबित आहे - यानंतर 17 एप्रिल 2010 ला चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर बॉम्बस्फोट झाला. यात 15 जण जखमी झाले होते - या बॉम्बस्फोटातल्या 14 पैकी 7 आरोपींना अटक करण्यात आलीय. पण, हल्ल्याचा मुख्य संशयित यासीन भटकळ अजून फरार आहे

भाजपला याचा फायदा होईल -शकील अहमद

दरम्यान, बंगळुरूमधल्या बॉम्बस्फोटावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये नवीनच वाद निर्माण झालाय. या बॉम्बस्फोटासंदर्भात काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी वादग्रस्त ट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये अहमद म्हणतात, बंगळुरूमध्ये भाजपच्या कार्यालयाजवळ झालेला बॉम्बस्फोट हा जर अतिरेकी हल्ला असेल तर येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला त्याचा नक्की फायदा होईल असं म्हटलं आहे. शकील अहमद यांच्या या वादग्रस्त ट्वीटवरून भाजपनं काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यानंतर, अखेर शकील अहमद यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं स्पष्ट केलं. काँग्रेसलाही यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2013 10:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...