अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार सुविधा - पंतप्रधान

अपघातग्रस्तांसाठी कॅशलेस उपचार सुविधा - पंतप्रधान

  • Share this:

modi man ki baat

26  जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमातून रस्ते सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. देशात दर मिनीटाला एका व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू होतो ही चितेंची बाब असल्याचं सांगत अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला 50 तासांच्या आत 'कॅशलेस' उपचार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. दरम्यान, 15 ऑगस्टच्या भाषणासाठी सूचना पाठवा, असं आवाहनही मोदींनी जनतेला केलं.

सध्या देशात प्रत्येक मिनिटाला एक अपघात होत आहे. ही भयंकर परिस्थिती लक्षात घेऊनच आम्ही रस्ते सुरक्षा विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते सुरक्षेबाबत सरकारबरोबरच जनजागृतीही होणं तेवढंच गरजेचं आहे, असं मोदी म्हणाले. वाढते रस्ते अपघात ही चिंतेची बाब आहे, अपघात रोखण्यासाठी सरकारसोबतच नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, प्रत्येकाने कुटुंबातील तरुणांना रस्ते नियमांचे महत्त्व पटवून द्यावे असे आवाहन मोदींनी केलं.

दरम्यान, पंतप्रधानांनी कारगील युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहून आपल्या 'मन की बात'ची सुरूवात केली. कारगिल युद्धांत आपला एक, एक सैनिक शत्रुच्या शंभर, शंभर सैनिकांवर भारी पडला. या वीरांना माझा शतश: प्रणाम', अशा शब्दांत पंतप्रधांनी शहीदांना अभिवादन केलं.

त्याचबरोबर येत्या 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून होणार्‍या भाषणासाठी मोदी यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण मुद्दे सुचवण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी सुचवलेल्या मुद्यांचा त्यांच्या भाषणात समावेश करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

First published: July 26, 2015, 2:44 PM IST

ताज्या बातम्या