मुस्लिम असल्यानेच याकूबला फाशी - ओवेसी

मुस्लिम असल्यानेच याकूबला फाशी - ओवेसी

  • Share this:

owasisi

24 जुलै : 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमनच्या फाशी देण्याच्या निर्णयावर आता एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवेसी यांनी मुक्ताफळं उधळलीयेत. याकूब मुस्लिम असल्याने त्याला फाशी होत असल्याचा आरोप काल (गुरुवारी) हैदराबादमधल्या एका सभेत ओवेसींनी केला आहे.

सरकार धर्माच्या आधारावर फाशीचा निर्णय घेत आहे. फाशीच द्याची असेल, तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना फाशी का देत नाहीत?, असा सवाल ओवेसींनी केला. तसंच धर्म बघून फाशी देऊ नका, हा पण एकप्रकारचा दहशतवादच आहे, अशी मुक्ताफळं ओवेसींनी उधळली आहेत.

दरमन्यान, ओवेसींनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर टीका होत आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 24, 2015, 1:31 PM IST

ताज्या बातम्या