जाती हिंसाविरोधी विधेयकाला मोदींचा विरोध

जाती हिंसाविरोधी विधेयकाला मोदींचा विरोध

  • Share this:

modi on pm05 डिसेंबर : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांना जाती हिंसाविरोधी विधेयकाला विरोध करणारे पत्र लिहिले आहे. या विधेयकामुळे समाजात फूट पडून तो विभागला जाईल अशी भीती मोदींनी व्यक्त केली आहे.

हे विधेयक मांडण्याची ही चुकीची वेळ असून सरकारच्या हेतूंविषयी शंका निर्माण करणारी आहे असा आरोप मोदी यांनी या पत्राद्वारे केला आहे. यासंबंधी मोदींनी अनेक ट्विट्सही केले आहेत. राजकीय समीकरणे आणि मतांचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून सरकार हे विधेयक आणत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.

हे विधेयक भारताच्या संघराज्य रचनेला धक्का लावणारे आहे. यामुळे समाजामध्ये दुही पडून हिंसा वाढेल असा इशाराही मोदींनी दिला आहे. यासंबंधीत राज्य सरकारांना विश्वासात घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. पण, हे विधेयक याच अधिवेशनात मांडले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

First published: December 5, 2013, 11:29 AM IST

ताज्या बातम्या