शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी आदेश बांदेकर

शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी आदेश बांदेकर

04 एप्रिलमुंबई : राज्यात घराघरात होम मिनिस्टर या मालिकेच्या निमित्ताने भावोजी म्हणून प्रसिद्धी पावलेले अभिनेते आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांची भारतीय चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजित पानसे यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याशी असलेली जवळीक अभिजित पानसे यांना भोवली असल्याचं बोलंल जातंय. तसंच भारतीय चित्रपट सेना या संघटनेचं नाव आता 'शिवसेना चित्रपट सेना' असं होणार असल्याची माहिती बांदेकर यांनी दिली. उपाध्यक्षपदी अभिनेता शरद पोंक्षे आणि सुबोध भावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अभिनेता दिंगबर नाईक यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहेत.

  • Share this:

04 एप्रिल

मुंबई : राज्यात घराघरात होम मिनिस्टर या मालिकेच्या निमित्ताने भावोजी म्हणून प्रसिद्धी पावलेले अभिनेते आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांची भारतीय चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजित पानसे यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याशी असलेली जवळीक अभिजित पानसे यांना भोवली असल्याचं बोलंल जातंय. तसंच भारतीय चित्रपट सेना या संघटनेचं नाव आता 'शिवसेना चित्रपट सेना' असं होणार असल्याची माहिती बांदेकर यांनी दिली. उपाध्यक्षपदी अभिनेता शरद पोंक्षे आणि सुबोध भावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अभिनेता दिंगबर नाईक यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2013 12:10 PM IST

ताज्या बातम्या