'भारत पुन्हा जिंकला', PM मोदींची ऐतिहासिक विजयावर पहिली प्रतिक्रिया!

'भारत पुन्हा जिंकला', PM मोदींची ऐतिहासिक विजयावर पहिली प्रतिक्रिया!

भाजपच्या दणदणीत विजयानंतर सर्वांना प्रतिक्षा होती ती मोदींच्या प्रतिक्रियेची...

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मे: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा ऐतिहासिक असा विजय मिळवला. सर्व विरोधक एकत्र आले असताना देखील मोदींनी पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपच्या या दणदणीत विजयानंतर सर्वांना प्रतिक्षा होती ती मोदींच्या प्रतिक्रियेची... 2014च्या यशानंतर मोदींनी 12च्या सुमारास ट्विटवरून पहिली प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे मोदी यावेळी काय बोलतात यासाठी सर्वजण त्यांच्या ट्विटवर नजर ठेवून होते. अखेर मोदींनी दुपारी 3च्या सुमारास ट्विटकरुन प्रतिक्रिया दिली.

भाजप आणि NDAच्या ऐतिहासिक विजयावर अमित शहांची पहिली प्रतिक्रिया

भाजपने मिळवलेल्या विजयावर मोदी म्हणाले,

सबका साथ सबका विकास सबका विश्वास = विजयी भारत

Together we grow.

Together we prosper.

Together we will build a strong and inclusive India.

India wins yet again! #VijayiBharat

2014मध्ये भाजपने जेव्हा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता तेव्हा मोदींनी दुपारी 12च्या सुमारास एक ट्वीट केले होते. मोदींच्या या ट्विटमध्येच त्यांनी 2019च्या विजयाचे भाकित केले होते. त्या ट्विटमध्ये मोदी म्हणाले होते की, ‘India has won! भारत की विजय, अच्छे दिन आने वाले हैं’. मोदींचा हा ट्विट देखील ऐतिहासिक ठरला होता. हा ट्विट नेटिझन्सनी 1 लाखहून अधिक वेळा रिट्विट केले होते. तर 85 हजार वेळा लाईक करण्यात आले होते.

VIDEO : 'राज ठाकरेंवर करमणूक कर लावला पाहिजे'

First published: May 23, 2019, 3:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading