Elec-widget

शिक्षकांच्या बहिष्काराचं 'अर्धशतक'

शिक्षकांच्या बहिष्काराचं 'अर्धशतक'

26 मार्चमुंबई : राज्यातल्या सीनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी परीक्षेच्या कामावर टाकलेला बहिष्कार आज 50 व्या दिवशीही सुरुच आहे. मात्र, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना या बहिष्कारावर तोडगा काढण्यात सपशेल अपयश आलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हस्तक्षेप करुन आश्वासन देऊनही शिक्षकांनी परीक्षेचं काम सुरु केलं नाही. मुंबई, पुणे, जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठ, नागपूर येथील तुकडोजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ या सात विद्यापीठांतील पदवी परीक्षेचं वेळापत्रक या बहिष्कारामुळे कोलमडून गेलंय. मराठवाड्यामधल्या दोन विद्यापीठांमध्ये सीनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आणि नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात परीक्षा सुरु झाल्या खर्‍या, पण आता या शिक्षकांनी पेपर तपासणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पदवी परीक्षा घेण्यासाठी 20 मार्च रोजी काढलेला जीआर हा परीक्षा अध्यादेशांचा भंग करणारा असल्याची टीकाही महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने केलीय. दरम्यान, राज्य सरकारने एमफुक्टोच्या दोन मागण्या मंजूर केल्याचा दावा केला. मात्र, मागण्या मंजूर झाल्या नाहीत ही फसवणूक आहे असा आरोप एमफुक्टोनं केला आहे.

  • Share this:

26 मार्च

मुंबई : राज्यातल्या सीनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी परीक्षेच्या कामावर टाकलेला बहिष्कार आज 50 व्या दिवशीही सुरुच आहे. मात्र, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना या बहिष्कारावर तोडगा काढण्यात सपशेल अपयश आलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हस्तक्षेप करुन आश्वासन देऊनही शिक्षकांनी परीक्षेचं काम सुरु केलं नाही. मुंबई, पुणे, जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठ, नागपूर येथील तुकडोजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ या सात विद्यापीठांतील पदवी परीक्षेचं वेळापत्रक या बहिष्कारामुळे कोलमडून गेलंय. मराठवाड्यामधल्या दोन विद्यापीठांमध्ये सीनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आणि नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात परीक्षा सुरु झाल्या खर्‍या, पण आता या शिक्षकांनी पेपर तपासणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पदवी परीक्षा घेण्यासाठी 20 मार्च रोजी काढलेला जीआर हा परीक्षा अध्यादेशांचा भंग करणारा असल्याची टीकाही महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने केलीय. दरम्यान, राज्य सरकारने एमफुक्टोच्या दोन मागण्या मंजूर केल्याचा दावा केला. मात्र, मागण्या मंजूर झाल्या नाहीत ही फसवणूक आहे असा आरोप एमफुक्टोनं केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2013 05:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...