पद्मावतीपाठोपाठ मुलायम सिंह यांची सून अपर्णा यादवचा 'घुमर' डान्स वादात

पद्मावतीपाठोपाठ मुलायम सिंह यांची सून अपर्णा यादवचा  'घुमर' डान्स वादात

अपर्णा यादवचा भाऊ अमन याचं नुकतेच लग्न झाले. हे लग्न एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालं. या लग्नातील महिला संगीतामध्ये त्यांनी हे घुमर गाण्यावर नृत्य केलं आहे. या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आता हे नृत्य चांगलंच चर्चेत आलं आहे.

  • Share this:

 लखनौ, 29 नोव्हेंबर:  गेले काही दिवस प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या पद्मावती प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष  मुलायम सिंह यांची सून अपर्णा यादव यांनी या सिनेमातील घुमर गाण्यावर नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अपर्णा यादवचा भाऊ अमन याचं नुकतेच लग्न झाले. हे लग्न एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालं. या लग्नातील महिला संगीतामध्ये त्यांनी हे घुमर गाण्यावर नृत्य केलं आहे. या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आता हे नृत्य चांगलंच चर्चेत आलं आहे.

राजपूत समाजाची करणी सेना ही संघटना मोठ्या प्रमाणात पद्मावती सिनेमाला विरोध करते आहे. या सिनेमात पद्मावतीला चुकीच्या पद्धतीने दाखवला गेल्याचा आरोप करण्यात येतो आहे.  त्यातलं घुमर गाणं हे प्रचंड गाजतं आहे तसंच वादातही अडकलं आहे. या गाण्यात पद्मावती राणीला नृत्य करताना दाखवल्याची बाब अनेकांना खटकली आहे. आतापर्यंत या सिनेमावर चार राज्यांनी बंदी घातली आहे.

त्यामुळे आता यानंतर हे प्रकरण नवं वळण घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 29, 2017, 10:08 PM IST

ताज्या बातम्या