कांदा निर्यातीवर प्रतिटन 850 डॉलर निर्यात मूल्य ; देशांतर्गंत भाव स्थिर ठेवण्यासाठी निर्णय

कांदा निर्यातीवर प्रतिटन 850 डॉलर निर्यात मूल्य ; देशांतर्गंत भाव स्थिर ठेवण्यासाठी निर्णय

किरकोळ बाजारातले कांद्याचे दर आणखी वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर प्रतिटन 800 डॉलरची ईएमपी अर्थात निर्यातमूल्य आकारण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे कांदा निर्यातीवर काही प्रमाणात बंधन येणार आहेत.

  • Share this:

23 नोव्हेंबर, नवी दिल्ली : किरकोळ बाजारातले कांद्याचे दर आणखी वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर प्रतिटन 850 डॉलरची ईएमपी अर्थात निर्यातमूल्य आकारण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे कांदा निर्यातीवर काही प्रमाणात बंधन येणार आहेत.

देशांतर्गंत किरकोळ बाजारपेठेत सध्या कांद्याचे दर प्रतिकिलो 50 ते 60 रुपयांच्या पुढे गेलेत. त्यामुळे शहरी मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये काहिसं नाराजीचं वातावरण वाढीस लागलं होतं. विशेषतः गुजरात निवडणुकीत भाजपला त्याचा फटका बसू शकत होता. म्हणूनच केंद्र सरकारने तातडीची उपाययोजना म्हणून कांदा निर्यातीवर काही प्रमाणात आर्थिक निर्बंध लावल्याचं स्पष्ट होतंय. पण या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा काही प्रमाणात फटका बसू शकतो.

या निर्णयामुळे देशांतर्गंत बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिर राहण्यास मदत होईल, अशी आशा सरकारला वाटतेय. तर हा निर्णय शेतकरी विरोधी असल्याचा सूर शेतकरी संघटनांनी लावलाय. तरीही सूत्रांच्या माहितीनुसार यंदा कांद्याचं उत्पादन मुळातच कमी आणि त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांद्याचे बाजारभाव फारसे कमी होणार नाहीत. असा अंदाज या क्षेत्रातले जाणकार व्यक्त करताहेत.

First published: November 23, 2017, 5:12 PM IST

ताज्या बातम्या