येत्या हिवाळी अधिवेशनात सरकार 'ट्रिपल तलाक'विरोधात कायदा आणणार

येत्या हिवाळी अधिवेशनात सरकार 'ट्रिपल तलाक'विरोधात कायदा आणणार

सप्रीम कोर्टाने 'ट्रिपल तलाक'वर बंदी घातल्यानंतर आता केंद्र सरकारही याविरोधात कायदा करण्याच्या तयारीत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचं विधेयक आणलं जाईल.

  • Share this:

21 नोव्हेंबर, नवी दिल्ली : सप्रीम कोर्टाने 'ट्रिपल तलाक'वर बंदी घातल्यानंतर आता केंद्र सरकारही याविरोधात कायदा करण्याच्या तयारीत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचं विधेयक आणलं जाईल.

गेल्या 22 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने मुस्लीम धर्मातील या ट्रिपल तलाक प्रथेविरोधात निकाल देत अशा प्रकारच्या तोंडी तलाक पद्धतीवर बंदी घातली होती. ही ट्रिपल तलाक पद्धती घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. पण अजूनही मुस्लिम महिलांमध्ये याबाबत म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. म्हणूनच केंद्र सरकारने ट्रिपल तलाकवर आता कायद्यानेच बंदी घालण्याची तयारी चालवलीय.

यासंबंधीचा नवीन कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी मंत्र्यांची एक समितीही तयार करण्यात आलीय. ही समिती मुस्लीम समाजातील प्रचलित तलाक पद्धतींचा अभ्यास करून त्यामध्ये सुधारणा सुचवणार आहे. सद्य परिस्थितीत ट्रिपल तलाक पीडित महिलांना पोलिसात तक्रार देता येते पण यासंबंधी कोणताच कायदा अस्तिवात नसल्याने आरोपींवर कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही म्हणूनच केंद्र सरकारने ट्रिपल तलाकविरोधात कठोर कायदा बनवण्याच्या हालचाली सुरू केल्यात. मुस्लिम महिलांमधून सरकारच्या या निर्णयाचं निश्चितच स्वागत होईल तर कट्टरवादी मौलवींकडून विरोध केला जाऊ शकतो.

First published: November 21, 2017, 6:13 PM IST

ताज्या बातम्या