S M L
  • पत्रकारावर ऍसिड हल्ला

    Published On: Mar 13, 2013 10:59 AM IST | Updated On: Mar 13, 2013 10:59 AM IST

    13 मार्चपरभणी : येथील पूर्णा शहरात पत्रकार दिनेश चौधरी यांच्यावर काल रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या ऍसिड हल्ल्यात त्यांची पत्नी आणि मुलगीही जखमी झाले. त्यांच्यावर नांदेड इथं उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. राज्यात गुटखा बंदी असली तरी पूर्णा इथं कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून गुटख्याची तस्करी केली जात असल्याविरोधात दिनेश चौधरी यांनी सातत्यानं आवाज उठवला होता. त्यामुळे काँग्रेसचा शहराध्यक्ष सय्यद अली सय्यद हसन यांनीच हल्ल्या केल्याचा संशय दिनेश चौधरी यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी प्‌ूर्णामधल्या पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पूर्णा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close